Karnataka Assembly elections Date : केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. कर्नाटकमध्ये एकाच टप्प्यांमध्ये मतदान होणार असून 10 मे रोजी मतदान होणार आहे. 13 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. कर्नाटक राज्यातील एकुण 224 जागांसाठी मतदान होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजप सरकार असून 24 मे रोजी त्यांच्या सरकारचा कार्यकाळ संपणार आहे.
Karnataka Assembly elections will be held on 10th May; counting of votes on 13th May pic.twitter.com/SYcfTnFnDB
— ANI (@ANI) March 29, 2023
कर्नाटकमध्ये एकुण 5,21,73,579 एवढे मतदार आहेत. तर 9.17 लाख नवीन मतदार जोडले गेले आहेत. याचबरोबर 100 पेक्षा अधिक वय असणारे 16 हजार मतदार आहेत. तसेच ज्यांचे वय 80 असे मतदार आपल्या घरातून मतदान करु शकतात. 1 एप्रिल रोजी ज्यांचे वय 18 पूर्ण होत आहे ते देखील मतदान करु शकतात. कर्नाटकमध्ये सध्या भाजपच्या 117 जागा आहेत. काँग्रेसच्या 69 जागा आहेत तर जेडीएसच्या 32 जागा आहेत.
मुंबईत पाणीकपात, जलबोगद्याच्या दुरुस्तीवर, जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं
2018 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला होता. यानंतर येदियुरप्पा 17 मे 2018 रोजी मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर अवघ्या सहा दिवसांमध्येच त्यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्यानंतर बसवाज बोम्मई हे मुख्यमंत्री झाले होते.
दरम्यान, काँग्रेसने निवडणूक जाहीर होण्याच्या आधीच 25 मार्च रोजी 124 उमेदवारांची घोषणा केली आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे वरुणा विधानसभेतून तर कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार हे कनकापुरातून निवडणूक लढवणार आहेत.