Download App

Karnataka Election : भाजपची स्टार प्रचारक यादी जाहीर; फडणवीस गेमचेंजर ठरणार?

  • Written By: Last Updated:

Karnatak Election :  कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री यांचा या यादीमध्ये समावेश आहे. महाराष्ट्रातून या यादीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समावेश आहे. त्यामुळे भाजप नेहमीप्रमाने ही निवडणुक देखील पुर्ण जोरदार लढणार असल्याचे दिसते आहे.

या यादीमध्ये अर्धे केंद्रीय मंत्रीमंडळ व 5 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. यावेळी भाजपच्या हातातून सत्ता जाणार असे असे अनेक सर्व्हेमध्ये सांगण्यात आले आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये भाजप आपली जोरदार ताकद लावणार असे दिसते आहे. तसेच यावेळी गुजरातप्रमाणे विधानसभेचे तिकीट वाटप करण्याच्या निर्णय कर्नाटकमध्ये घेण्यात आल्याचे दिसते आहे. त्यामुळे आत्तापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला रामराम केला आहे. त्यामुळे भाजपसमोर आता मोठे आव्हान उभे राहिले आहे.

या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह एकुण 40 नेत्यांची नावे आहेत. त्यामुळे कर्नाटक निवडणुकीत चांगलीच चुरस दिसून येणार आहे. यामध्ये महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे देखील नाव आहे. याआधी ते गोवा राज्याच्या निवडणुकीवेळी तिथे प्रभारी होते. त्यामुळे यावेळी देखील त्यांना काही मोठी जबाबदारी मिळते का ते पाहणे महत्वाचे असणार आहे.

भारताविरुद्धच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर; ‘या’ स्टार खेळाडूंचा समावेश

 

Tags

follow us