Download App

विद्यार्थ्यासोबतचा रोमान्स मुख्याध्यापिकेला महागात! चुंबन फोटोशुट केल्यानं थेट निलंबनाची कारवाई

  • Written By: Last Updated:

Karnatak News : शाळेच्या सहली दरम्यान एका मुख्याध्यापिकेने (Headmistress) आपल्या विद्यार्थ्यासोबत काढलेले काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. या आक्षेपार्ह फोटोमुळं नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. या फोटोत दिसणारा मुलगा हा दहावीचा विद्यार्थी असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, हे फोटो व्हायरल ( photo viral) झाल्यानं पालकांना चांगलाच धक्का बसला. पालकांनी मुख्याध्यापिकेची तक्रार करताच शाळा प्रशासनाने मुख्याध्यापिकेवर कारवाई केली.

‘परिस्थिती अशीच राहिली तर फिरणंही मुश्किल होईल’; सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला थेट इशारा 

शाळेय सहलीला गेलेले असतांना एका ४२ वर्षीय मुख्याध्यापिकेने विद्यार्थ्यासोबत रोमँटिक फोटोशूट केले. हे फोटो व्हायरल झाले. व्हायरल फोटोशूटमध्ये विद्यार्थी मुख्याध्यापिकेचं गालावर चुंबन घेताना, साडीचा पदर खेचताना, मिठी मारताना आणि उचलून घेतांना दिसत आहे. या फोटोच मुख्यध्यापिकाही विद्यार्थ्यासोबत हातात गुलाब पकडून रोमँटिक अंदाजात पोज देताना दिसत आहे. कर्नाटकात हा प्रकार घडला आहे. चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेच्या सहली दरम्यान हा प्रकार घडला.

मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिल्ली दौरे मग शेतकरी प्रश्नांसाठी का नाही? कोल्हेंचा सरकारवर घणाघात 

दरम्यान, आता हे फोटो व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थ्याच्या पालकांनी मुख्याध्यापिकेविरोधात शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करून मुख्याध्यापिकेच्या चौकशी मागणी केली..याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिकाऱ्यांनी माहिती देतांना सांगितले की, शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळेत जाऊन घटनेची माहिती घेतली. या चौकशीत 22 ते 25 डिसेंबर दरम्यान विद्यार्थ्यांना होरानाडू, धर्मस्थळ, याना आणि इतर काही ठिकाणी शैक्षणिक सहलीवर नेण्यात आलं होतं. त्यावेळी विद्यार्थ्यी आणि मुख्याध्यापिकेने रोमँटिक फोटो काढले. हे फोटो एका विद्यार्थ्याने काढले होते. इतर विद्यार्थी आणि शाळेतील कर्मचाऱ्यांना याबाबत काहीही माहिती नव्हती, असं चौकशीत समोर आलं. शिवाय मुख्याध्यापिकेने काही फोटो आणि व्हिडिओ डिलीट केल्याचे समोर आलं आहे.

दरम्यान. विद्यार्थ्याशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून शाळा प्रशासनाने शाळेतील शिक्षकाला निलंबित केले आहे. याप्रकरणी शाळा प्रशासनानेही चौकशीचे आदेश दिले.

 

follow us