मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिल्ली दौरे मग शेतकरी प्रश्नांसाठी का नाही? कोल्हेंचा सरकारवर घणाघात
Amol Kolhe : कांदा निर्यातबंदीवरुन राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe)यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांना थेट सवाल केला आहे. मुख्यमंत्री शिंदे हे सातत्यानं सांगतात की, हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. त्यावरुन खासदार कोल्हे यांनी 7 डिसेंबरला कांदा निर्यातबंदी (Onion export ban)करण्यात आली, त्यानंतर आज 23 वा दिवस आहे. या 23 दिवसांमध्ये सरकारमधील एकाही प्रमुख नेत्यानं केंद्राच्या नजरेला नजर भिडवून प्रश्न विचारायची हिंमत झाली नाही, अशी घणाघाती टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली.
Year Ender 2023 : सरत्या वर्षात लँडमार्क ठरलेले सर्वोच्च न्यायालयाचे पाच निकाल…
खासदार कोल्हे म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिल्ली दौरे होतात मग शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी का नाही? दिल्लीचे राज्यसरकारचे नेते मांडलिक झाले, लाचार झाले आहेत. आजही पवारच कृषिमंत्री आहेत असे लोकांना वाटत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल एक फुल 2 डाऊटफुल सरकार काहीही करत नाही. मी टीकाकारांना उत्तरे देणार नाही, असेही खासदार कोल्हे म्हणाले.
अजितदादा बोलतात ते करतातच! आता कोल्हेंचं काय होईल? अनुभव सांगत विजय शिवतारेंचं उत्तर
कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवहेलना तर इतरांचं काय होत असेल? सरकारकडून जाहिरातींवर अमाप खर्च करत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीप्रमाणे शंभर दिवस शेळीसारखं जगल्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगलेले बरे, असेही यावेळी खासदार कोल्हे म्हणाले
स्वाभिमानाची आणि संघर्षाची आम्ही वाट निवडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत आहे. पण येतांना कांदा निर्यातीचा जीआर घेऊन या, नाहीतर शेतकऱ्यांचा आक्रोश कणठाळ्या बसवतील असे म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारला थेट इशाराच दिला आहे.