Download App

karnataka Assembly Election : बजरंग दलाच्या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा काँग्रेसला सवाल…

तुम्ही बजरंग दल आरएसएसची तुलना देशद्रोह्यांसोबत कशीकाय करता? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. कर्नाटकातील उडपी जिल्ह्यातून मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय. भाजपसाठी मुख्यमंत्री शिंदे मैदानात उतरलेत. कर्नाटकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजप उमेदवारांचा प्रचार करीत आहेत.

छत्रपती संभाजीनगरच्या कलेक्टरांना ‘ईडी’ची नोटीस, चौकशीसाठी बोलावणं

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, देशात बजरंग दल आणि आरएसएस एक देशभक्त संघटन आहे. ज्यावेळी देशावर संकट येतं तेव्हा दोन्ही संघटना देशभक्ती दाखवतात. कोरोना काळात दोन्ही संघटनांनी चांगलं काम केलंय. आपल्या जीवाशी खेळून त्यांनी दुसऱ्यांचा जीव वाचवण्याचं काम केलं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

‘The Kerala Story’ सिनेमावरून असदुद्दीन ओवैसी यांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल, म्हणाले…

दरम्यान, कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जाहीरनाम्यात बजरंग दल संघटनेवर कारवाई करणार असल्याचं जाहीर केलं. त्यावरुन कर्नाटकात भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरु आहे.

बजरंग दल वादावर काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं होतं. ते म्हणाले, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात संघटनेवर कारवाई करणार असल्याचं म्हटलं नाही तर ज्या संघटना देशात द्वेष पसरवतात त्या सर्व संघटनांना हा इशारा असल्याचं म्हटलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यावर आता मुख्यमंत्री शिंदेंनी भाष्य केलं आहे.

तुमचं जेवढ आयुष्य, तेवढं शरद पवारांचं राजकारण; भुजबळांनी पिळले राऊतांचे कान

कोरोना काळात या संघटनांनी सर्वसामान्य जनतेचा जीवाशी खेळून जीव वाचवला असून त्यांची तुलना तुम्ही देशद्रोह्यांशी कशीकय करताय? असा सवाल करीत मुख्यमंत्री शिंदेंनी काँग्रेसला धारेवर धरलंय. दरम्यान, कर्नाटकात येत्या 10 मे रोजी मतदान पार पडणार आहे. कर्नाटकची जनता त्यांनी उत्तर देणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

Tags

follow us