Download App

Karnataka Election : राजकीय गणितं बदलणार?; माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर काँग्रेसमध्ये दाखल

  • Written By: Last Updated:

Jagadish Shettar Joins Congress : कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तिकीट नाकारल्यामुळे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एक दिवसापूर्वीच त्यांनी भाजपचा राजीनामा दिला होता.

यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. सवडी यांच्याप्रमाणेच काँग्रेसने शेट्टर यांनाही तिकीट देण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर शेट्टर म्हणाले, ‘मी भाजपचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे सदस्यत्व घेतल्यावर बहुतेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ज्येष्ठ नेता असल्याने मला तिकीट मिळेल, असे वाटत होते. पण, मला तिकीट नाकारल्याचे समजल्यावर धक्का बसल्याचे शेट्टर म्हणाले.

नाट्य परिषद निवडणूक : प्रशांत दामलेंकडून कांबळींच्या सत्तेचे वस्त्रहरण

विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष शेट्टर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर रणदीप सिंह सुरजेवाला यांनी अनेक ट्विट केले. शेट्टर यांचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले आहे की, एक नवा अध्याय, नवा इतिहास, नवी सुरुवात. भाजपचे माजी मुख्यमंत्री, माजी भाजप अध्यक्ष, माजी विरोधी पक्षनेते, सहा वेळा आमदार राहिलेले जगदीश शेट्टर यांनी आज काँग्रेस परिवारात प्रवेश केला आहे. पक्षाकडून त्यांचे स्वागत.

ठाकरे-पवारांसमोरच जयंत पाटलांचे सूचक विधान! म्हणाले… कुछ तो मजबुरीया…!

दुसर्‍या ट्विटमध्ये त्यांनी शेट्टर यांच्या फोटोसह लिहिले आहे की, अपमान आणि विश्वासघात आता भाजपचा डीएनए झाला आहे. भाजपची ‘चाल-चेहरा-चरित्र’. लिंगायत नेतृत्वाचा विश्वासघात ! वोक्कालिगा समाजाचा विश्वासघात! एससी-एसटी-ओबीसी समाजाची फसवणूक! जगदीश शेट्टर यांचा कर्नाटक सरकारच्या ४०% लुटीला मूक प्रेक्षक राहण्यास नकार! एक नवीन सुरुवात!

भाजपच्या व्होटबँकेला तडा
लिंगायत समाजाचे शेट्टर काँग्रेसमध्ये गेल्याने याचा फटका भाजपला सहन करावा लागू शकतो. कर्नाटकातील सुमारे १८ टक्के मतदार हे लिंगायत समाजाचे आहेत, ज्यांना पारंपारिकपणे भाजप समर्थक मानले जाते. अशा परिस्थितीत शेट्टर काँग्रेसमध्ये गेल्याने भाजपच्या या व्होटबँकेला तडा जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

Tags

follow us