Karnataka Election 2023 : दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यात १० मे रोजी विधानसभा निवडणुका होणार आहेत. (Karnataka assembly elections 2023) त्यानंतर १३ मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी बुधवारी (२९ मार्च) ही घोषणा केली. (Karnataka Election 2023 Date) त्यांनी सांगितले की, यावेळी कर्नाटक निवडणुकीसाठी ५.२१ कोटी मतदार नोंदणीकृत आहेत, विधानसभेच्या २२४ जागांवर मतदान होणार आहे. या मतदानामध्ये ४१ हजार मतदार हे ट्रान्सजेंडर असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे .
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, कर्नाटक निवडणुकीत पहिल्यांदाच ९.१७ लाख मतदार मतदान करणार आहेत. मात्र, नवीन मतदारांमध्ये ट्रान्सजेंडर्सची संख्या खूपच कमी आहे. त्याचवेळी, राज्यात एकूण ट्रान्सजेंडरची गणना केली तर ही संख्या ४२ हजार ७५६ असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यापैकी ४१ हजार मतदारांची नोंदणी झालेली आहे.
प्रथमच पोल आयकॉन नियुक्त
यावेळी ट्रान्सजेंडरचे मतदान येथे महत्त्वाचे मानले जात आहे. खरं तर, कर्नाटकात पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने एका ट्रान्सजेंडर मंजम्मा जोगाठीला (Manjamma Jogathi) पोल आयकॉन म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. याचे कारण म्हणजे ट्रान्सजेंडर समुदायाला निवडणुकीत मतदान करण्यासाठी अधिकाधिक प्रवृत्त करणे.
कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार मीना यांच्या मते, जोगती एक ट्रान्सजेंडर आहे. त्या कर्नाटक जनपद अकादमीच्या अध्यक्षा होत्या. विशेष म्हणजे तिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता तिची कर्नाटक निवडणुकीसाठी निवडणूक दूत म्हणून निवड करण्यात आली आहे.
‘राज्यात 2 लाखांहून जास्त ट्रान्सजेंडर’
जोगती सांगतात की कर्नाटकात त्यांच्या समाजाची लोकसंख्या इतर राज्यांपेक्षा जास्त आहे. ते म्हणाले, “आमच्या राज्यातील एकूण लोकसंख्या दोन लाखांहून अधिक आहे, परंतु त्यापैकी अनेकांकडे कागदपत्रे नसल्यामुळे सर्व ट्रान्सजेंडर मतदार यादीत नाव नोंदवू शकले नाहीत.”
आतापर्यंत त्यांची मतदानाची टक्केवारी कमी
एकूण ट्रान्सजेंडर मतांपैकी, गेल्या निवडणुकीत राज्य केवळ ९.८ टक्के मतदारांनी मतदान केले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही या समाजाच्या एकूण नोंदणीकृत मतदारांपैकी केवळ ११.४९ टक्के मतदारांनी मतदानात भाग घेतला होता.