देश हादरला! कर्नाटकमध्ये बस आणि कंटेनरचा भीषण अपघात 17 जणांचा जागीच मृत्यू, 21 प्रवासी जखमी

Karnataka Chitradurga accident मध्ये 17 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 21 लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Karnataka Chitradurga Accident

Karnataka Chitradurga Accident

Karnataka Chitradurga bus and container terrible accident 17 died 21 injured : देशाला हादरवणारी एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. कर्नाटकमधील चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियूर या ठिकाणी एका बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. ज्यामध्ये तब्बल 17 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 21 लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

नवी सुरुवात करताना सावधान!’ या’ पाच राशींच्या जीवनात उलथा पालथ होण्याची शक्यता…

हा अपघात राष्ट्रीय महामार्ग 48 वर झाला. एक खाजगी बसला भरधाव वेगाने आलेल्या एका कंटेनरने धडक दिली. ही बस बंगळुरूवरून शिवमोग्गा येथे जात होती. अगोदर हा कंटेनर दुभाजकाला धडकला होता. त्यानंतर त्याने बसला धडक दिली. त्यात बसला आग लागली. यामध्ये जखमी झालेल्यांवर सध्या हिरियूर आणि चित्रदुर्ग येथील रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.

नवी सुरुवात करताना सावधान!’ या’ पाच राशींच्या जीवनात उलथा पालथ होण्याची शक्यता…

 

 

Exit mobile version