Download App

Karnataka CM : काँग्रेससाठी ‘बजरंगबली’ ठरलेले शिवकुमार ठरू शकतात त्रासदायक?; ही आहेत कारणं

  • Written By: Last Updated:

Karnataka CM : कर्नाटकमध्ये काँग्रेसने प्रचंड बहुमताने विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. या विजयामागे दोन व्यकींचा मोठा वाटा असून, यात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या आणि दुसरे म्हणजे पक्षासाठी हनुमानाची भूमिका निभावणारे डीके शिवकुमार यांच्या नावाचा समावेश आहे. विजयानंतर आता दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आपल्या नेत्यांना पोस्टरच्या माध्यमातून भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करत आहेत. परंतु, कर्नाटकचा भावी मुख्यमंत्री कोण होणार याचा अंतिम निर्णय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनाच घ्यायचा आहे. सध्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी डीके शिवकुमार यांची सर्वाधिक चर्चा आहे. मात्र, डीके यांना मुख्यमंत्री बनवणेही पक्षासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या आघाडीवर असल्याचे दिसून येत आहेत. शिवकुमार काँग्रेससाठी कशाप्रकारे त्रासदायक ठरू शकतात हे आपण थोडक्यात जाणून घेऊया.

Pune News : खडकवासला धरणात ९ मुली बुडाल्या, ७ जणींना वाचवण्यात यश; दोघींचा मृत्यू

देवेगैडा यांच्यासाठीदेखील त्रासदायक ठरले होते शिवकुमार
एकेकाळी देवेगौडा घराण्याची सर्वात मोठी डोकेदुखी ठरलेले डीके शिवकुमार यावेळी मुख्यमंत्रीपदाचे सर्वात मोठे दावेदार आहेत. शिवकुमार यांनी प्रत्येक वेळी पक्षाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी काम केले आहे. एवढेच नव्हे तर, पक्षाने सोपवलेली प्रत्येक जाबाबदारी शिवकुमार यांनी प्रामाणिकपणे पूर्ण केले आहे.

ईडी आणि सीबीआय प्रकरण
डीके शिवकुमार यांनी पहिली निवडणूक लढवली तेव्हा त्यांना यासाठी आपली जमीन गहाण ठेवावी लागली होती. मात्र यानंतर डीकेच्या संपत्तीत दरवर्षी वाढ होऊ लागली. आज डीके शिवकुमार हे कर्नाटकातील सर्वात श्रीमंत नेत्यांपैकी एक आहेत. डीके यांच्याकडे 1400 कोटींहून अधिक संपत्ती आहे. यामुळेच ते केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. सीबीआयने प्रथम त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर ईडीनेही मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

राज ठाकरेंची शेलारांवर टीका; म्हणाले, “निवडणुकीत नाक्यावर….”

सप्टेंबर 2019 मध्ये, ईडीने डीके शिवकुमार यांची चौकशी सुरू केली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सुमारे चार दिवस सातत्याने चौकशी केल्यानंतर डीके यांना अटक करण्यात आली होती. यानंतर डीके शिवकुमार जवळपास 50 दिवस तुरुंगात होते. यानंतर सोनिया गांधी स्वत: डीके यांना भेटण्यासाठी तुरुंगात पोहोचल्या. ज्याची माहिती त्यांनी विजयानंतर दिली. तेव्हा त्यांनी सोनियांना कर्नाटकात पक्षाला विजयापर्यंत नेणार असल्याचे सांगितले होते. डीके शिवकुमार यांच्यावर सध्या मनी लाँड्रिंग, करचोरी आणि बेहिशोबी मालमत्तेचे असे 19 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यात अनेकांवर डीकेवर अटकेची टांगती तलवार आहे. ईडीने त्यांना अनेकवेळा चौकशीसाठी बोलावले आहे. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री करणं काँग्रेससाठी त्रासदायक ठरू शकते.

‘धकधक गर्ल’चा आज वाढदिवस, माधुरी दीक्षितचे सुरूवातीचे अनेक चित्रपट फ्लॉप, आज करोडोंच्या संपत्तीची मालकीण

डीके यांना मुख्यमंत्री बनवल्यास केंद्रीय यंत्रणा त्यांच्यावर कडक कारवाई करू शकतात. डीके सध्या जामिनावर बाहेर असल्याने त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्याचवेळी सीबीआयच्या प्रकरणात डीके यांना उच्च न्यायालयाकडून झटका बसला आहे. अशा परिस्थितीत डीके यांना मुख्यमंत्री करण्याचा धोका काँग्रेसला पत्करायचा नाही. कारण 2024 पूर्वी राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशसारख्या हिंदी पट्ट्यातील राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, जिथे काँग्रेसचा विजय अपेक्षित आहे. यापैकी दोन राज्यांमध्ये काँग्रेसचीही सत्ता आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस डीके यांना मुख्यमंत्री करून कोणताही धोका पत्करू इच्छित नाही.

Kalicharan Maharaj : आमदार-खासदारांनी पिन मारली म्हणून… ‘त्या’ गुन्ह्यावर कालीचरण महाराजांची प्रतिक्रिया…

तज्ज्ञांचे मत काय?
सीबीआय आणि ईडीच्या प्रकरणे लक्षात घेता डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री केले जाणार नाही असा ठाम विश्वास राजकीय तज्ज्ञांना आहे. सिद्धरामय्या यांच्यावरही दोन खटले असून, त्यात आरोपपत्रही दाखल झाले आहे. मात्र, सिद्धरामय्या यांच्यापेक्षाही शिवकुमार यांचे प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते. त्यात काँग्रेसचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिल्यास असे लक्षात येते की, हिमाचल प्रदेशात वीरभद्र सिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असूनही काँग्रेसने त्यांना हटवले नाही. काँग्रेसच्या या भूमिकेनंतरही पक्षाला कोणतेही नुकसान झाले नाही तर फायदा झाला.

नव्या फॉर्म्युल्याची जोरदार चर्चा
एकीकडे शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत असताना दुसरीकडे कार्नाटकात एका नव्या फॉर्म्युल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ज्यात दोन मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव ठेवल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस पक्षातील बंडखोरी टाळण्यासाठी सिद्धरामय्या डीके शिवकुमार यांना पहिली दोन वर्षे आणि डीके शिवकुमार यांना शेवटची तीन वर्षे मुख्यमंत्री बनवण्याच्या सूत्रावर शिक्कामोर्तब करू शकतात. असा सल्लाही सिद्धरामय्या यांनी पक्षाला दिल्याचे बोलले जात आहे.

Tags

follow us