राज ठाकरेंची शेलारांवर टीका; म्हणाले, “निवडणुकीत नाक्यावर….”

राज ठाकरेंची शेलारांवर टीका; म्हणाले, “निवडणुकीत नाक्यावर….”

MNS chairperson Raj Thackeray On Ashish Shelar : देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे (karnataka assembly election) निकाल शनिवारी (13 मे) जाहीर झाले. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा (BJP) पराभव केला. निकाल लागल्यानंतर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियाही येत आहेत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही यावर निकालवर भाष्य केलं होतं. भाजपच्या स्वभाव आणि वागणुकीमुळे हा पराभव झाल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले. त्यानंतर भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. दरम्यान, आता ठाकरेंनेही शेलारांचा जोरदार समाचार घेतला. निवडणुकीत नाक्यावर सभा घेणारी ही लोकं आहेत, अशी टीका राज ठाकरेंनी केली.

राज ठाकरे शेलारांकव टीका करतांना म्हणाले की, निवडणुकीत नाक्यावर सभा घेणारी ही लोकं आहेत. काही गोष्टी विरोधकांच्या असल्या तरी त्या मान्य केल्या पाहिजेत. तो मोठेपणा नरेंद्र मोदी दाखवू शकतात. मग त्यांच्या पक्षातल्या खालच्या लोकांना कळलं पाहिजे. भारत जोडो यात्रेला किती झाकायचा प्रयत्न झाला, तरी कर्नाटकमधील निवडणुकीत भारत जोडोचा परिणाम दिसला, असं म्हणत राहुल गांधी आणि भारत जोडोचं कौतूक केलं. पुढं ते म्हणाले, जर त्यातून बोध घ्यायचा नसेल तर त्यांनी आपलं सुरूच ठेवावं. काही गोष्टी मोठ्या मनाने मान्य केल्या पाहिजेत. त्यांचं अस्तित्व मुळात मोदींवर आहे. यांना खाली कोण ओळखत नाही, अशी टीका राज ठाकरेंनी केली.

Pune News : खडकवासला धरणात ९ मुली बुडाल्या, ७ जणींना वाचवण्यात यश दोघींचा मृत्यू

काल राज ठाकरेंनी कर्नाटक निवडणुकीच्या निकालावर भाष्य करतांना सांगितलं होतं की, विरोधी पक्ष जिंकत नाही, तर सत्ताधारी हरत असतो. मला वाटतं हा पराभव स्वभावाचा पराभव आहे, वर्तनाचा पराभव आहे. आम्हाला वाकवू शकतात, आमचं कोण वाकडं करू शकतो, असा समज असलेल्या वृत्तीचा हा पराभव आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आशिष शेलार यांनी टीका केली होती. घरात बसून स्वप्न पाहिल्यावर स्वप्नातल्या प्रतिक्रिया माणूस देऊ शकतो, असा टोला शेलारांनी लगावल आपण जिवंत आहोत, हे दाखवण्यासाठी राज ठाकरे प्रतिक्रिया देत असतात, असं वक्तव्य शेलारांनी केलं होतं.

दरम्यान, शेलारांच्या या वक्तव्याचा राज ठाकरेंनी समाचार घेत निवडणुकीत नाक्यावर सभा घेणारी ही लोकं आहेत, अशी टीका केली. आता ठाकरेंच्या या टीकेला आशिष शेलारांकडून काय प्रत्युत्तर येते, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube