Download App

सुरुवातीलाच धुसफूस! मंत्र्याच्या वक्तव्याने काँग्रेस अडचणीत; कर्नाटकात शिवकुमारांचं काय होणार ?

Karnataka Congress : कर्नाटकातील निवडणुका जिंकल्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या वादावर मोठ्या मुश्किलीने तोडगा काढत काँग्रेसने (Karnataka Congress) सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. शिवकुमार (D. K. Shivkumar) यांना माघार घ्यायला लावली. आता कुठे सुरळीत होत असल्याचे वाटत असतानाच एका ज्येष्ठ नेत्याच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.

कर्नाटक काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि सिद्धरामय्या सरकारमधील (Siddaramaiah Cabinet) कॅबिनेट मंत्री एम. बी. पाटील (M. B. Patil) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. पाटील म्हणाले, सिद्धरामय्या हेच पाच वर्षे मुख्यमंत्री राहतील. सत्तावाटपाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. पाटील यांचे हे वक्तव्य काँग्रेसली अडचणीचे ठरू शकते. कारण पक्ष नेतृत्वाने मोठ्या मेहनतीने शिवकुमार यांना सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी राजी केले आहे.

केजरीवालांच्या मदतीला काँग्रेस : संसदेत अध्यादेशाला विरोध करणार

मैसुरू येथे एका कार्यक्रमादरम्यान पाटील म्हणाले, सत्तावाटपाबाबत काही जरी चर्चा झाली असती तर पक्ष नेतृत्वाने आम्हाला नक्कीच सांगितले असते. असा कोणताच प्रस्ताव दिलेला नाही. काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी के. सी. वेणुगोपाल (K. C. Venugopal) यांनीही त्या दिवशी अशी कोणतीच माहिती दिली नाही.

तसे पाहिले तर एम. बी. पाटील हे सिद्धरामय्या यांच्या अतिशय जवळचे मानले जातात. त्यांच्या याच वजनामुळे त्यांना कॅबिनेटमध्ये समाविष्ट करून घेण्यात आले आहे.

पाटील यांनी राष्ट्रीय महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्या पत्रकार परिषदेचाही हवाला दिला. ज्यामध्ये त्यांनी सत्ता वाटप फॉर्म्युलावर कोणतेही उत्तर दिले नव्हते. ते म्हणाले, जर पक्ष नेतृत्वाने असा काही निर्णय घेतलेला असता तर त्याच दिवशी त्याबाबत घोषणा केली असती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी ज्या पोर्टफोलियोची मागणी केली आहे त्यावर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कदाचित हेच कारण असावे ज्यामुळे पाटील यांनी असे वक्तव्य केले.

दलित-आदिवासी राष्ट्रपती बनवण्यामागे BJP चा स्वार्थ; नव्या संसद सदनाच्या उद्घाटनवरून खर्गेंची टीका

दरम्यान, काँग्रेसला कर्नाटकात विजय मिळाल्यानंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार, यावर मोठा पेच निर्माण झाला होता. सिद्धरामय्या आणि डी. के.  शिवकुमार या दोघांनीही दावा ठोकला होता. शिवकुमार माघार घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. मात्र, असेही सांगितले जात आहे की नंतर मुख्यमंत्री मिळण्याच्या आश्वासनावरच त्यांनी सध्या माघार घेत उपमुख्यमंत्री होण्याचे मान्य केले. अशात आता पाटील यांचे हे वक्तव्य कर्नाटकातील काँग्रेसच्या नव्या सरकारसाठी डोकेदुखी ठरू शकते.

 

Tags

follow us