Karnataka Election Result 2023 : कर्नाटक निवडणुकीत मतमोजणीला (Karnataka Election Result 2023) आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात काँग्रेसला (Congress) मोठी आघाडी मिळाली आहे. तर भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. भाजप सरकारमधील अनेक मंत्री पिछाडीवर पडले आहेत. भाजपचे अनेक मोठे नेते मागे पडले असून भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
असे असले तरी यंदा विधानसभेत त्रिशंकू परिस्थिती राहिल असे अंदाज व्यक्त केले जात आहेत. दुसरीकडे भाजपाच्या केंद्रीय नेत्याने विजयाचा दावा केला आहे. यासाठी या नेत्याने मागील तीन निवडणुकांतील आकडेवारी सादर केली आहे.
All Exit Polls depend on vote percent. At 73.19%, Karnataka has seen the highest voting percentage, ever.
Lets look at the vote share and seats won by BJP and INC, the two main parties in fray, in previous elections.
In 2008, BJP won 110 seats with vote share of 33.86%,…
— Amit Malviya (@amitmalviya) May 12, 2023
भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय (Amit Malviya) यांनी काही गणिते मांडली आहेत. त्यांनी एक ट्विटही केले आहे. यामध्ये काँग्रेसकडे मतांची टक्केवारी जास्त असली तरी भाजपकडे जास्त जागा येत असल्याचे काही निवडणुकांतून दिसून आल्याचे मालवीय यांनी म्हटले आहे.
मालवीय यांनी ट्विटमध्ये सर्व एक्झिट पोल्सचे अंदाज मतांच्या आकडेवारीवर अवलंबून असतात. या निवडणुकीत कर्नाटकमध्ये 73.19 टक्के अर्थात आतापर्यंतचं सर्वाधिक मतदान झालं आहे, असं या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Karnataka Election : काँग्रेसमुक्त भारत म्हणून चिडवायचे, आता भाजपामुक्त दक्षिण भारत झाला : खर्गे
सन 2008 मध्ये भाजपने 110 जागा जिंकल्या होत्या. पण पक्षाला 33.86 टक्के मते मिळाली होती. दुसरीकडे काँग्रेसला 34.76 टक्के मते मिळूनही जागा फक्त 80 मिळाल्या होत्या. त्यानंतर 2018 मध्ये भाजपने 104 जागा जिंकल्या असताना 36.22 टक्के मते मिळाली होती. दुसरीकडे काँग्रेसला 38.14 टक्के जागा मिळूनही फक्त 80 जागा जिंकता आल्या होत्या, असे मालवीय यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
हिंदू मतांची विभागणी काँग्रेसच्या पथ्यावर
या ट्रेंडमध्ये फक्त 2013 च्या निवडणुका अपवाद असल्याचे मालवीय यांनी म्हटले आहे. 2013 मध्ये भाजप आणि कर्नाटक जनता पक्ष यांच्यात हिंदू मतांची विभागणी झाली होती. त्यामुळे काँग्रेसचा फायदा झाला. नाहीतर काँग्रेसला कितीही टक्के मते मिळाली तरी त्यांना कधीच 80 जागांपेक्षा जास्त मजल मारता आलेली नाही.
2023 च्या एक्झिट पोलनुसार भारतीय जनता पार्टीला 37 टक्के तर काँग्रेसला 40 टक्के मते मिळतील असा अंदाज आहे. 3 टक्क्यांचा फरक आहे. त्यामुळे निकाल काय येतील, याचा अंदाज कुणालाही लावता येणार नाही, असे मालवीय यांनी म्हटले आहे.