पीएम मोदी, अमित शहा, राहुल गांधींचा तुफान प्रचार; पाहा, कुणाची कामगिरी ठरली बेस्ट

Karnataka Election Results : कर्नाटकातील निवडणुकीचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले (karnataka Election Results) असून येथे भाजपाचा दणदणीत पराभव झाला आहे. भाजपला मोदींचा जादूई करिष्माही तारू शकला नाही. विधानसभा त्रिशंकू होईल असा अंदाज खोटा ठरला असून कानडी जनतेने काँग्रेसला एकहाती राज्याचा कारभार सोपवला आहे. 10 मे रोजी झालेल्या मतदानासाठी काँग्रेस, भाजप आणि जेडीएसच्या नेत्यांनी जोरदार […]

Amit Shah, Rahul gandhi and PM Modi

Amit Shah

Karnataka Election Results : कर्नाटकातील निवडणुकीचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले (karnataka Election Results) असून येथे भाजपाचा दणदणीत पराभव झाला आहे. भाजपला मोदींचा जादूई करिष्माही तारू शकला नाही. विधानसभा त्रिशंकू होईल असा अंदाज खोटा ठरला असून कानडी जनतेने काँग्रेसला एकहाती राज्याचा कारभार सोपवला आहे. 10 मे रोजी झालेल्या मतदानासाठी काँग्रेस, भाजप आणि जेडीएसच्या नेत्यांनी जोरदार प्रचार केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जोरदार प्रचार केला. अनेक रॅली काढल्या, रोड शो केले. प्रचार सभा घेतल्या. तर आता अशाच आघाडीच्या दहा नेत्यांचा स्ट्राईक रेट जाणून घेऊ या.

Karnataka Election : आता काँग्रेसचे आमदार फुटणार का ? चव्हाण म्हणाले, देशात काहीही..

पीएम मोदी

भाजपकडून पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, जेपी नड्डा यांनी प्रचार केला. पीएम मोदींनी 44 मतदारसंघ कव्हर केले. यामध्ये 17 ठिकाणी भाजप, 24 ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. तर जेडीएसच्या 3 उमेदवारांना यश मिळाले. पीएम मोदी यांचा स्ट्राइक रेट 39 टक्के राहिला.

अमित शहा 

गृहमंत्री अमित शहा यांनी 36 मतदारसंघ कव्हर केले. त्यापैकी 10 भाजप तर काँग्रेसने तब्बल 23 मतदारसंघात विजय मिळवला. जेडीएसला 3 जागा मिळाल्या. शहा यांचा स्टाइक रेट 28 टक्के राहिला.

योगी आदित्यनाथ 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 11 मतदारसंघ कव्हर केले. यामध्ये भाजप 3 तर काँग्रेसच्या 7 ठिकाणी यश मिळाले. आदित्यनाथ यांचा स्टाइक रेट 27 टक्के राहिला.

राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 26 विधानसभा मतदारसंघात तुफान प्रचार केला. यामध्ये त्यांनी 17 मतदारसंघात काँग्रेसला विजय मिळवून दिला. तर 8 ठिकाणी भाजप आणि एका जागेवर जेडीएसचा उमेदवार विजयी झाला. या हिशोबाने राहुल गांधींचा स्ट्राइक रेट 65 टक्के राहिला आहे.

Karnataka Election Result : काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या मुलाचा विजय की पराभव? पाहा निकाल

प्रियांका गांधी 

काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी 26 मतदारसंघ कव्हर केले. यामध्ये 16 ठिकाणी पक्षाच्या उमेदवारांना यश मिळाले. तर 9 ठिकाणी बीजेपी आणि एका जागेवर जेडीएसचे उमेदवार विजयी झाले.

मल्लिकार्जुन खर्गे

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी 28 मतदारसंघात प्रचार केला. त्यामध्ये 16 जागांवर काँग्रेस, 9 जागांवर भाजप आणि 3 जागांवर जेडीएसचे उमेदवार विजयी ठरले. खर्गे यांचा स्टाइक रेट 57 टक्के राहिला. काँग्रेसच्या नेत्यांचा प्रचार चांगला राहिला. निवडणुकीत भाजप प्रचारात आघाडी घेत असतो. मात्र कर्नाटकच्या निवडणुकीत यंदा सगळेच वेगळे दिसत होते. उमेदवार निवड, तिकीट वाटप, प्रचार यंत्रणा, निवडणुकीचे व्यवस्थापन या प्रत्येक ठिकाणी काँग्रेसने बाजी मारल्याचे दिसले.

Exit mobile version