Karnataka Election Result : काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या मुलाचा विजय की पराभव? पाहा निकाल
Karnataka Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. यामध्ये कर्नाटकमधील चुरशीच्या लढतींपैकी प्रियांक खर्गें (Priyank Kharge) यांची लढत चुरशीची होती. प्रियांक खर्गे हे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांचे चिरंजीव आहेत. गुलबर्गा जिल्ह्यातील चित्तापूर विधानसभा मतदासंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांच्याविरोधात भाजपकडून माणिकरत्न राठोड रिंगणात उभे ठाकले होते. प्रियांक खर्गेंचा पराभव करुन मल्लिकार्जून खर्गेंना मोठा धक्का देण्याची रणनीती भाजपने आखली होती. पण प्रियांक खर्गेंनी 13 हजारपेक्षा जास्त मतांनी माणिकरत्न राठोड यांचा पराभव केला आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रियांक खर्गे चर्चेत आले होते. त्याचे कारण म्हणजे त्यांनी पंतप्रधान मोदींविरोधात केलेले वादग्रस्त वक्तव्य. प्रियांकाच्या वादग्रस्त वक्तव्यावर बराच वाद झाला होता. यानंतर निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपमानास्पद शब्द वापरल्याबद्दल त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
दरम्यान प्रियांक खर्गे यांनी चित्तापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. सिद्धरामय्या सरकारमध्ये ते मंत्रीही राहिले आहेत. यावेळी भाजपने प्रियांकाच्या विरोधात माणिकरत्न राठोड यांना उमेदवारी दिली. प्रियांक खर्गेंनी 13640 मतांनी माणिकरत्न राठोड यांचा पराभव केला आहे. प्रियांक यांना 81323 तर मणिकांत यांना 67683 मते मिळाली.
Karnataka Election : माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर शिष्याकडूनच पराभूत
2018 मध्येही प्रियांक खर्गे यांनी येथून निवडणूक जिंकली होती. त्यानंतर त्यांना 69700 मते मिळाली. प्रियांक खर्गे यांच्यासमोर भाजपचे वाल्मिकी नायक उभे होते, त्यांना 65307 मते मिळाली. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या रूपाने अडीच दशकांनंतर गांधी घराण्याबाहेरचा नेता काँग्रेसचा अध्यक्ष झाला आहे.
काँग्रेससाठी चित्तापूर विधानसभेची जागा महत्वाची मानली जात होती. याचं जागेवर मागील निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली होती. चित्तापूर विधानसभेच्या जागेवर अनेक वर्षांपासून खर्गे कुटुंबियांचं वर्चस्व होतं. 2008 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर मल्लिकार्जून खर्गे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर 2009 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर खर्गे दिल्लीत गेले.
Karnataka Election Result : बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना…मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर खोचक टीका
त्यानंतर पोटनिवडणुकीत खर्गे यांचा मुलगा प्रियांकचा भाजपच्या वाल्मिकी नायक यांनी दारुण पराभव केला. पण 2013 मध्ये प्रियांक खर्गे यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून वडिलांचा वारसा जपला. या निवडणुकीत भाजपकडून माणिकरत्न राठोड हे एक मोठं आव्हान प्रियांक खर्गेंच्यासमोर उभं होतं.