Karnataka Election : माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर शिष्याकडूनच पराभूत

Karnataka Election : माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर शिष्याकडूनच पराभूत

Karnataka Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. यामध्ये कॉंग्रेसला (Congress)स्पष्ट बहुमत मिळालं आहे. या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यामध्ये अनेकांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यातच हुबळी-धारवाड मध्य (Hubli-Dharwad Central) मतदारसंघात भाजप आणि कॉंग्रेसमध्ये चुरशीची लढत झाली. या मतदारसंघात सहावेळा आमदार आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर (Jagdish Shettar) हे कॉंग्रेसच्या तिकिटावर लढले तर त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून भाजपचे उमेदवार महेश टेंगीनाका (Mahesh Tenginaka) यांच्यात लढत झाली. मतमोजणीमध्ये महेश टेंगीनाका यांनी जगदीश शेट्टर यांचा पराभव केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये महेश टेंगीनाका यांना 64 हजार 910 मतं मिळाली आहेत तर शेट्टर यांना 29 हजार 340 मतं मिळाल्याची माहिती समोर आली आहे. हुबळी धारवाड मध्य विधानसभा मतदारसंघात गुरु विरुध्द शिष्य अशी लढत झाली. त्यात गुरुचा शिष्यानं पराभव केला आहे.

बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना…मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर खोचक टीका

कर्नाटकमध्ये कॉंग्रेसनं बाजी मारली असली तरी या मतदारसंघात मात्र कॉंग्रेसला निराशेचा सामना करावा लागला आहे. शेट्टर यांचा पराभव झाल्याने त्यांची आणि कॉंग्रेसची निराशा झाली आहे. याच जागेवर आम आदमी पक्षाकडून विकास सोप्पीन यांना उमेदवारी देण्यात आली होती, त्यांना नोटापेक्षाही कमी 197 मतं तर NOTA ला 474 मतं मिळाली आहेत. अर्थातच या ठिकाणी आम आदमी पक्षाला मतदारांनी डावललं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आधी जगदीश शेट्टर यांनी 16 एप्रिलला भाजपला रामराम ठोकला होता. लिंगायत समाजातील जगदीश शेट्टर यांनी कॉंग्रेस नेत्यांची भेट घेत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. हुबळी धारवाड मध्य विधानसभा मतदारसंघात गुरु विरुध्द शिष्य अशी लढत झाली. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपने त्यांचेच शिष्य महेश टेंगिनाका यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते.

जगदीश शेट्टर यांनी येथून सहावेळा विजय मिळविला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. पण माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत हुबळी धारवाडमधून विधानसभा निवडणूक लढवायची होती. मात्र पक्षाने त्यांना तिकीट दिले नाही. त्यांना शेवटची निवडणूक लढवायची होती परंतु पक्षाने त्यांना तिकीट नाकारले, त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. शेट्टर हे हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर उमेदवार होते.

जगदीश शेट्टर हे कर्नाटकातील भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते. हुबळी धारवाड भागातील लिंगायत समाजाचा मोठा चेहरा मानला जात होते. त्यांचे वडील एसएस शेट्टर हे जनसंघ पक्षाचे हुबळी-धारवाडचे महापौर होते आणि नगर महापालिकेत नगरसेवक म्हणूनही काम केले होते. 1994 मध्ये जगदीश शेट्टर पहिल्यांदा भाजपचे आमदार म्हणून विजयी झाले होते. 2012-2013 दरम्यान त्यांनी कर्नाटकचे 15 वे मुख्यमंत्री म्हणून काम केले. शेट्टर हे 2008 मध्ये कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष देखील होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube