Video : बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना…मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर खोचक टीका

Video : बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना…मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर खोचक टीका

Eknath Shinde Attacks Uddhav Thackeray : कर्नाटक निवडणूक निकाल जाहीर होऊ लागले आहे. यामध्ये काँग्रेसने भाजपाला धोबीपछाड देत बहुमत मिळवले आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून आनंद साजरा केला जात आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य केले. कोणाला कधी आनंद वाटतो कळत नाही. दुसऱ्याचे घर जळताना काही लोक आनंद व्यक्त करक आहेत. मात्र स्वत:चं घर जळालं ते आधी वाचवा. बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना, असा खोचक टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेतला लगावला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावर आहे. त्यांनी आज एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी ठाकरे गटावर टीका केली. ‘शासन आपल्या दारी’ या राज्यव्यापी अभियानाचा शुभारंभ एकनाथ शिंदे यांनी केला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक राजकीय परिस्थितींवर भाष्य केले. तसेच त्यांनी यावेळी बोलताना कर्नाटक निवडणुकीवर देखील प्रतिक्रिया दिली.

Karanatak Election 2023 : लोकांनी राष्ट्रवादीचं पार्सल परत पाठवलं, फडणवीसांचा पवारांना टोला

नेमकं काय म्हणाले शिंदे?
कुणाला कधी आनंद वाटतो कळत नाही. दुसऱ्याचे घर जळताना काही लोक आनंद व्यक्त करक आहेत. मात्र स्वत:चं घर जळालं ते आधी वाचवा. बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना, असा टोला एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना नाव न घेतला लगावला.

Karnataka Election : आता काँग्रेसचे आमदार फुटणार का ? चव्हाण म्हणाले, देशात काहीही..

तसेच आपल्या भश्यनाच्या सुरुवातील बोलताना शिंदे म्हणाले, मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. सर्वोच्च न्यायालयाने विरोधकांना निर्णयाच्या माध्यमातून चांगली चपराक दिली आहे. हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे. घटनाबाह्य बोलणाऱ्यांना कोर्टाने कालबाह्य केलं, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube