Ashok Chavan on Karnataka Election Results : कर्नाटकात भाजपचा पराभव जवळपास निश्चित झाला आहे. काँग्रेसने (Karnataka Election Result) विजयाकडे वाटचाल सुरू केली असून यंदा काँग्रेसचे सरकार असेल हे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या पराभवावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून विरोधकांनी सडकून टीका केली आहे. या निकालावर काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
चव्हाण म्हणाले, लोकांचे जे प्रश्न आहेत त्यासंदर्भात कोणता पक्ष बोलतो हे लोकांसाठी जास्त महत्वाचे असते. गॅस सिलिंडरच्या किंमतींमुळे नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया दिसून आल्या. काँग्रेसचा जाहीरनामाही लोकांच्या पसंतीस उतरला. यात महिलांसाठी पाच महत्वाचे मुद्दे आहेत. महिलांना बसमधून मोफत प्रवास, दर महिन्याला काही पैसे देणार, बेरोजगारांना भत्ता देणार या घोषणा फायदेशीर ठरल्या. महिलांचे मतदानाचे प्रमाण वाढल्याचे चित्र होते.
अमूल विरुद्ध नंदिनी वाद: दूध उत्पादक जिल्ह्यांमध्ये जेडीएस-भाजपाला दणका
यानंतर पत्रकारांनी त्यांना काँग्रेसचे आमदार बंगळुरूला बोलावले जात आहेत. आमदार फुटतील अशी भीती काँग्रेसला वाटत आहे का, असा प्रश्न विचारला. त्यावर चव्हाण म्हणाले, भीती नाही पण खबरदारी म्हणून तसे केले जात असावे. सध्या देशात काहीही घडू शकते. मागील काही वर्षात वाईट अनुभव आला आहे. मध्य प्रदेश आणि गोव्यात तेच घडलं. सरकारे पाडली. कर्नाटकात तर निवडून आलेले सरकार पाडले. या प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्याची काळजी पक्ष नेतृत्वाने घेतली आहे, असे चव्हाण म्हणाले.
आर अशोक यांचा पराभव करून DK Shivakumar सुमारे एक लाख मतांनी विजयी
दरम्यान, आता काँग्रेसही सतर्क असून कोणताही दगाफटका होऊ नये याची काळजी घेत आहे. काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना बंगळुरूला बोलावून घेतले आहे. घोडेबाजार टाळण्यासाठी या आमदारांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येणार असल्याचेही समजते. यानंतर राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. अजून पूर्ण निकाल हाती आलेले नाहीत. त्यामुळे चित्र अजून स्पष्ट नाही. मात्र सध्याच्या स्थितीवरून तरी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरत असल्याचे दिसून येत आहे.