Download App

कर्नाटकच्या जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करणार; विजयांनंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया

Karnataka Election Results Rahul Gandhi Speaks : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊ लागले आहे. मात्र निकालाची आकडेवारी पाहता कर्नाटकात कॉग्रेसने बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. दरम्यान या विजयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी कर्नाटक जनतेचे आभार मानले आहे.

नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?
कर्नाटक निवडणुकीत एका बाजूला सरकारच्या जवळ असलेल्या भांडवलदारांची सत्ता होती. तर दुसरीकडे गरीबांची ताकद होती, काँग्रेस पक्ष कर्नाटकात गरिबांच्या पाठीशी होता. मी कर्नाटकच्या जनतेचे, कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे आणि कर्नाटकात काम केलेल्या सर्व नेत्यांचे अभिनंदन करतो.

काँग्रेस पक्ष कर्नाटकात गरिबांच्या पाठीशी होता. कर्नाटकने सांगितले की या देशाला प्रेम आवडते. कर्नाटकात द्वेषाचा बाजार बंद झाला, प्रेमाची दुकाने उघडली. पहिल्या मंत्रिमंडळात पहिल्याच दिवशी 5 आश्वासने पूर्ण करणार असेही राहुल गांधी म्हणाले आहे.

निकालाचे आकडे काय सांगतायत?
दुपारी 3.00 पर्यंतच्या आकडेवारीनुसार एकूण 224 जागांपैकी काँग्रेस 137 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 62 जागांवर आघाडीवर आहे. जेडीएस 21 जागांवर पुढे आहे. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला 113 जागांची गरज आहे.

निवडणुकीत राहुल गांधींचा विजयाचा वाटा
भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी 500 किलोमीटरहून अधिक अंतर चालत जास्तीत जास्त 21 दिवस कर्नाटकात राहिले. लोकांना भेटले, त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि या विजयाचा पाया रचला. निवडणुकीसाठीही राहुल यांनी 18 रॅली आणि दोन रोड शो केले. त्यांच्याशिवाय, मल्लिकार्जुन खरगे यांनी 35 रॅली आणि 1 रोड शो, प्रियंका गांधी यांनी 14 रॅली आणि 11 रोड शो आणि सोनिया गांधी यांनी हुबळीमध्ये 1 रॅली केली.

Tags

follow us