Download App

Karnataka Election : एक दोन नाही तब्बल ‘इतके’ मंत्री बसले घरी; मतदारांचा कौल गेला विरोधात

Karnataka Election Results : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल (Karnataka Election Results) स्पष्ट झाला आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होणार आहे. राज्यात भाजपची मोठी पडझड झाली आहे. दक्षिणेतील एकमेव राज्यही पक्षाने गमावले आहे. तसेच या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा झटका बसला आहे. या निवडणुकीत कानडी जनतेनं तब्बल 13 मंत्र्यांना घरी बसवले आहे.

कर्नाटक विधानसभेसाठी 10 मे रोजी मतदान झाले. त्यानंतर आज मतमोजणी झाली. यामध्ये काँग्रेसला मतदारांनी स्पष्ट कौल दिला आहे. ताज्या माहितीनुसार काँग्रेसने 119 जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपला फक्त 64 जागा मिळाल्या आहेत. आणखी काही जागांचा निकाल येणे अद्याप बाकी आहे.

पीएम मोदी, अमित शहा, राहुल गांधींचा तुफान प्रचार; पाहा, कुणाची कामगिरी ठरली बेस्ट

या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या 13 मंत्र्यांचा पराभव झाला आहे. यामध्ये मुधोला मतदारसंघातून गोविंदा करजोला पराभूत झाले आहेत. बेल्लारी ग्रामीण मतदारसंघात श्रीरामुलु पराभूत झाले आहेत.

वरुणा मतदारसंघात व्ही. सोमण्णा यांना पराभवाचा झटका बसला आहे. येथे काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या विजयी झाले आहेत. कामराजनगर मतदारसंघात वी.सोमन्ना पराभूत झाले आहेत. चिक्कनायकहल्ली मतदारसंघात जे. सी. मधुस्वामी पराभूत झाले आहेत. हिरेकेरुरु मतदारसंघात बी. सी. पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला.

चिक्काबल्लापूर मतदारसंघात डॉ. के. सुधाकर पराभूत झाले आहेत. होसकोटे मतदारसंघा एम. टी. बी. नागराज पराभूत झाले आहेत. के. आर. पेट या विधानसभा मतदारसंघात नारायणगौडा पराभूत झाले आहेत. तिपापूर मतदारसंघात बी. सी. नागेश यांना पराभवाचा झटका बसला आहे.

Karnataka Election : काँग्रेसमुक्त भारत म्हणून चिडवायचे, आता भाजपामुक्त दक्षिण भारत झाला : खर्गे

येलबुर्गा मतदारसंघात हलप्पा अचार तसेच नवलगुंडा विधानसभा मतदारसंघात शंकर मुनेकोप्पा पराभूत झाले आहेत. पराभूत झालेले सर्व उमेदवार हे भाजप सरकारमध्ये विविध खात्यांचे मंत्री होते. या मंत्र्यांना या निवडणुकीत मतदारांनी साफ नाकारले आहे.

दरम्यान, काँग्रेसने आता सरकार स्थापन करण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत. राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. मागील वेळचा अनुभव असल्याने यंदा काही दगाफटका होऊ नये याची पूर्ण काळजी काँग्रेसकडून घेतली जात आहे. सर्व आमदारांना बंगळुरूला येण्याच्या सूचना दिल्या आहेत. आमदारांना थेट हेलिकॉप्टरने बंगळुरुला आणण्यात येत असल्याची माहिती आहे.

Tags

follow us