Download App

भाजप आमदाराची जीभ घसरली; म्हणाला, ‘सोनिया गांधी विषकन्या त्यांनी पाकिस्तान’..

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे विषारी सापासारखे आहेत, असे वक्तव्य काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी केले होते. त्यांनी या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही सुरू असलेला वाद काही थांबण्यास तयार नाही. भाजप नेत्यांनी काँग्रेस नेत्यांवर टीकेची झोड उठविली आहे. मात्र, टीका करताना भाजप नेत्यांकडूनही भाषेची मर्यादा पाळली जात नसल्याचे समोर आले आहे. आज भाजप आमदाराने सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचा उल्लेख विषकन्या असा केला आहे.

‘हाच खरा टर्निंग पॉइंट’ ; खर्गेंच्या वक्तव्यावर भाजप खासदाराने केलं मोठं भाकित

सोनिया गांधी या विषकन्या आहेत. सगळ्या जगाने मोदी यांचं नेतृत्व मान्य केलं आहे. एक काळ असा होता की पंतप्रधान मोदींना अमेरिकेने व्हिसा नाकारला होता. नंतर त्यांनी रेड कार्पेट टाकलं आणि मोदींचं स्वागत केलं. आता खर्गेंनी पंतप्रधान मोदींना विषारी साप म्हटलं आहे. ते विष ओक आहेत असं म्हटलं होतं. मात्र मी खर्गेना सांगू इच्छितो की ज्या पक्षात तुम्ही नाचत आहात सोनिया गांधी विषकन्या आहेत. सोनिया गांधी या चीन आणि पाकिस्तानसोबत मिळून त्यांच्या एजंटचं काम केलं, असं म्हणत भाजपा आमदार बासनगौडा यांनी सोनिया गांधी यांच्यावर टीका केली.

काय म्हणाले खर्गे ?

खर्गे यांनी काल प्रचार सभेत पंतप्रधान मोदी यांना उद्देशून ते विषारी साप असल्याचे म्हटले होते. या वक्तव्यानंतर देशभरात गदारोळ उठला. आपले वक्तव्य अंगलट येत असल्याचे लक्षात येताच आणि निवडणुकीत याचा फटका बसू शकतो याचा अंदाज आल्यानंतर खर्गे यांनी तत्काळ दिलगिरी व्यक्त केली.

सत्तार भावनिक माणूस, सत्तारांच्या वक्तव्यावर विखेंचं स्पष्टीकरण

भाजपचा हल्लाबोल

यानंतर भाजप नेत्यांनी मात्र हा मुद्दा हातोहात उचलला आणि काँग्रेसवर तुफान हल्ला चढवला. काँग्रेसने खर्गे यांना पक्षाचे अध्यक्ष केले पण त्यांनी कुणी मानत नाही. म्हणून त्यांनी सोनिया गांधी यांनी केलेल्या वक्तव्यापेक्षाही भयानक वक्तव्य करण्याचा विचार केला, अशी टीका केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली होती.

या वक्तव्याबद्दल खर्गे यांनी तत्काळ माफी मागावी. पंतप्रधानांसाठी अशी भाषा वापरल्याने काँग्रेस कोणत्या पातळीवर गेली आहे, हे दिसून येते असे भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री शोभा करंदालजे म्हणाल्या होत्या.

Tags

follow us