‘हाच खरा टर्निंग पॉइंट’ ; खर्गेंच्या वक्तव्यावर भाजप खासदाराने केलं मोठं भाकित

‘हाच खरा टर्निंग पॉइंट’ ; खर्गेंच्या वक्तव्यावर भाजप खासदाराने केलं मोठं भाकित

Karnataka Polls 2023 : कर्नाटकातील कलबुर्गी येथील प्रचार सभेत (Karnataka Polls) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. भाजपचे नेते तर खर्गे यांच्यावर अक्षरशः तुटून पडले आहेत. आता कर्नाटकातील भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी खर्गे यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत हा टर्निंग पॉइंट असेल. दक्षिणेकडील राज्यांतील लोक पंतप्रधान नरेंद्र मोदीच काय तर कोणाच्याही विरोधात वैयक्तिक टीकाटिप्पणी स्वीकार करत नाहीत. जरा थांबा आणि 10 मे रोजी काँग्रेसच्या ताबूतवर शेवटचा खिळा कसा ठोकला जातो ते पहा, असे ट्विट सूर्या यांनी केले आहे.

काय म्हणाले खर्गे ?

खर्गे यांनी काल प्रचार सभेत पंतप्रधान मोदी यांना उद्देशून ते विषारी साप असल्याचे म्हटले होते. या वक्तव्यानंतर देशभरात गदारोळ उठला. आपले वक्तव्य अंगलट येत असल्याचे लक्षात येताच आणि निवडणुकीत याचा फटका बसू शकतो याचा अंदाज आल्यानंतर खर्गे यांनी तत्काळ दिलगिरी व्यक्त केली.

भाजपचा हल्लाबोल 

यानंतर भाजप नेत्यांनी मात्र हा मुद्दा हातोहात उचलला आणि काँग्रेसवर तुफान हल्ला चढवला. काँग्रेसने खर्गे यांना पक्षाचे अध्यक्ष केले पण त्यांनी कुणी मानत नाही. म्हणून त्यांनी सोनिया गांधी यांनी केलेल्या वक्तव्यापेक्षाही भयानक वक्तव्य करण्याचा विचार केला, अशी टीका केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली होती.

या वक्तव्याबद्दल खर्गे यांनी तत्काळ माफी मागावी. पंतप्रधानांसाठी अशी भाषा वापरल्याने काँग्रेस कोणत्या पातळीवर गेली आहे, हे दिसून येते असे भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री शोभा करंदालजे म्हणाल्या होत्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube