Download App

कर्नाटकात आयारामांची चलती; दलबदलूंना तिकीट देण्यात ‘हा’ पक्ष ठरला अव्वल !

Karnataka Assembly Elections 2023 : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत (Karnataka Assembly Elections) प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप आणि काँग्रेसकडून जोरदार प्रचार केली जात आहे. भाजपने तर पंतप्रधानांनाही प्रचाराच्या मैदानात उतरवले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील राज्यात झंझावाती प्रचार करत आहेत.

शाह यांनी बागलकोट येथे प्रचार सभेत काँग्रेसवर मोठा आरोप केला होता. ते म्हणाले होते की काँग्रेसकडे निवडणूक लढण्यासाठी नेते नाहीत. उधार घेतलेल्या नेत्यांच्या जीवावर काँग्रेस लढत आहे. शाह यांच्या वक्तव्यानंतर प्रश्न पडतो की खरंच काँग्रेससह अन्य पक्षांनी उमेदवार आयात केले आहेत का, कोणत्या पक्षात किती दलबदलू आहेत, ही मंडळी इतकी महत्वाची का ठरत आहेत, हे प्रश्न उपस्थित होत आहेत. तिकीट वाटपावेळी अनेकांनी तिकीट मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी पार्टी बदलून किंवा अपक्ष म्हणून निवडणूक मैदानात एन्ट्री घेतली.

राधाकृष्ण विखे पाटलांशी दोस्ती पण… अब्दुल सत्तारांनी घेतला यूटर्न

भाजपने 52 आमदारांना दिला नारळ

भाजपचाच विचार केला तर भाजपला तिकीट देताना खूप कसरत करावी लागली. भाजपने सगळ्यात उशीरा उमेदवारांची यादी जाहीर केली. पक्षाने सर्वाधिक 52 विद्यमान आमदारांना घरचा रस्ता दाखवला. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार व माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनाही तिकीट नाकारले.

तिकीट कापले गेल्यानंतर नाराज लोकांनी पक्षच बदलला. जगदीश शेट्टार, लक्ष्मण सावदी, के. अंगारा, आर. शंकर, एमपी कुमार स्वामी यांच्यासह अनेकांना भाजपला राम राम केला. यातील बरेच जण काँग्रेसमध्ये गेले. काही जेडीएसमध्ये गेले. शेट्टार यांना काँग्रेसने हुबळी सेंट्रल मतदारसंघातून तिकीट दिले आहे. लक्ष्मण सावदी यांनाही तिकीट देण्यात आले.

मौत के सौदागर ते विषारी साप; पंतप्रधान मोदींवर कॉंग्रेसची ‘एवढ्या’ वेळा आक्षेपार्ह टीका

कोणत्या पक्षात किती आयाराम ?

कर्नाटक विधानसभेत एकूण 224 जागा आहेत. भाजप, काँग्रेस आणि जेडीएस यांच्यात लढत होत आहे. या तीन्ही पक्षातील दलबदलूंचा विचार केला तर जेडीएसमध्ये सर्वाधिक दलबदलू आहेत. जेडीएसने सर्वाधिक 28 दलबदलूंना तिकीट दिले आहे. त्याचवेळी भाजपने 17 जणांना तर काँग्रेसने दुसऱ्या पक्षातून आलेल्या 6 आयारामांना तिकीट दिले आहे.

Tags

follow us