Karnataka Ex DGP Om Prakash Death Investigation : कर्नाटकचे (Karnataka) माजी डीजीपी ओम प्रकाश यांचा मृतदेह (Om Prakash Death) स्वत:च्याच घरात सापडला. त्यांच्या मृ्त्यूमुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत, यामुळे त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. ओम प्रकाश यांच्या मृत्यूमागे त्यांच्या जवळच्या कुटुंबातील सदस्याचा सहभाग (Om Prakash Death Investigation) असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. दरम्यान, त्यांच्या मृत्यूची बातमी मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
या घटनेचा पहिला संशय त्याची पत्नी पल्लवी आहे. त्यामुळे पोलिसांनी पल्लवीला ताब्यात घेतलंय. सध्या तिची चौकशी सुरू केली आहे. दंगल असो किंवा इतर कोणत्याही प्रकारचा वाद असो, आयपीएस ओम प्रकाश क्षणार्धात तोडगा काढत असत आणि (Karnataka Crime) शांतता प्रस्थापित करत असत. अशा परिस्थितीत, ते स्वतःच्या घरातला वाद का सोडवू शकले नाही? असा सवाल निर्माण होतोय. त्यांच्या कौटुंबिक कलाहाची कल्पना केवळ शेजारीच नाही, तर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना देखील होती.
खळबळजनक! कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांचा मृत्यू, पत्नीनेच खून केल्याचा संशय
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निवृत्तीपासून आयपीएस ओम प्रकाश आणि त्यांची पत्नी पल्लवी यांच्यात मतभेद होते. अनेक वेळा हा वाद पोलिसांपर्यंत देखील पोहोचला होता. परंतु पोलिसांनी कधीही गुन्हा नोंदवला नाही, तो विभागाचा अंतर्गत मामला असल्याचे सांगितलं जायचं. ओम प्रकाश अन् त्यांच्या पत्नीत दररोज भांडणे होत असत. त्यांच्या घरातून अनेकदा मारामारी आणि ओरडण्याचे आवाज येत असत. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी असंही म्हटलंय की, या घटनेमागील कारण कौटुंबिक वाद असू शकते, असं शेजाऱ्यांनी म्हटलंय.
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकराच्या डोक्यात सैतान… भररस्त्यात तरूणीवर गोळ्या झाडल्या, कुठे घडलं?
पोलिसांनी सांगितलं की, मागील काही दिवसांपासून आयपीएस ओम प्रकाश यांची पत्नी पल्लवी खूपच आक्रमक झाली होती. काही दिवसांपूर्वीच तिने घरात खूप गोंधळ घातला होता. यामुळे पोलीसही आले होते. यावेळी, त्यांच्या घराबाहेर शेजाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती. परंतु या सगळ्यात आयपीएस ओमप्रकाश यांची हत्या होईल, अशी कोणालाही अपेक्षा नव्हती. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएस ओम प्रकाश यांना काहीतरी वेगळं घडणार, अशी भनक लागली होती. या संदर्भात त्यांनी पोलिसांकडे तक्रारही दाखल केली होती.
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांचा मृतदेह रविवारी त्यांच्या घरात संशयास्पद परिस्थितीत आढळून आला. त्याच्या शरीरावर जखमांच्या खुणा आहेत, ज्यावरून त्यांना मारहाण करून ठार मारण्यात आल्याचं दिसून येतं. या घटनेच्या वेळी आयपीएस ओमप्रकाश यांच्या पत्नी आणि मुलगी देखील घरी होती. पोलिस आले तेव्हाही दोघेही लॉबीमध्ये बसलेल्या आढळल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची माहिती पत्नी पल्लवीने फोनवरून पोलीस नियंत्रण कक्षालाही दिली. पोलिसांनी सध्या पल्लवीला ताब्यात घेतले आहे आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आता पोलीस पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत.