Karnataka Road Accident In Yalapur : कर्नाटकातील उत्तरा कन्नड जिल्ह्यातील यल्लापुरा महामार्गावर भीषण अपघात (Karnataka Accident) झालाय. गोलापुरा येथे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या ट्रकचे नियंत्रण सुटले आणि तो दरीत कोसळला. त्यामुळे ट्रक चक्काचूर झालाय. या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. आज 22 जानेवारी रोजी पहाटे चारच्या सुमारास हा (Road Accident) अपघात झालाय.
Video: राजीव खंडेलवाल, साई ताम्हणकरच्या ‘सिक्रेट ऑफ शिलेदार्स’ वेबसीरिजचा उत्कंठावर्धक ट्रेलर
कर्नाटकातील उत्तरा कन्नड जिल्ह्यात आज पहाटे एक मोठा रस्ता अपघात झाला. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले. सावनूरहून कुमठा बाजारपेठेत भाजी विक्रीसाठी जात असलेल्या ट्रकला अपघात झाल्याची घटना (Truck Crash) घडली. भरधाव वेगात ट्रकचे नियंत्रण सुटून ट्रक उलटला, त्यामुळे हा भीषण अपघात झाला, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नारायण एम यांनी दिली आहे. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
आज पहाटे भाजीपाला ट्रकमध्ये हे लोक प्रवास करत होते. ते 50 मीटर खोल दरीत पडले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. मृत्यू झालेले सर्व फळ विक्रेते सावनूर येथून फळे विकण्यासाठी यल्लापुराकडे निघाले होते. उत्तरा कन्नडचे पोलीस अधीक्षक एम नारायण यांनी सांगितले की, ते सावनूर-हुबळी रस्त्यावर प्रवास करत असताना जंगलाच्या परिसरात हा अपघात झाला.
…तर आर्थिक स्थिरता बिघडू शकते; ट्रम्प यांनी शपथ घेताच रघुराम राजन यांनी व्यक्त केली ‘ही’ भीती
नारायण यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, ‘पहाटे चारच्या सुमारास ट्रक चालक दुसऱ्या वाहनाला रस्ता देण्याचा प्रयत्न करत असताना डावीकडे गेला. तो सुमारे 50 मीटर खोल दरीत पडला.’ घाटीत रस्त्यावर सुरक्षा भिंत नाही. 10 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 15 जण गंभीर जखमी झाले. जखमींना हुबळी येथील KIMS रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
यल्लापुरा येथे ट्रक 50 मीटर खोल दरीत कोसळली. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचावकार्य सुरू केले. प्राथमिक तपासात ट्रकचे ब्रेक फेल झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू आहे.