Download App

Karnataka IPS-IAS Dispute: उघड भांडणे उच्चस्तरीय महिला अधिकाऱ्यांना भोवले! सरकारने घेतला मोठा निर्णय

कर्नाटक : कर्नाटकातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वादात नवा ट्विस्ट आला आहे. दोन्ही वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांनी एकमेकांवर आरोप केल्यानंतर कर्नाटक सरकारकडून दोन्ही अधिकाऱ्यांची कोणतीही पोस्टिंग न देता कर्नाटक सरकारने त्यांच्या बदल्या केल्या आहेत.

आयपीएस अधिकारी डी रुपा मुदगील (IPS officer D Roopa) आणि आयएएस रोहिणी सिंदुरी (IAS Rohini Sindhuri) यांची बदली करण्यात आलीय.

Maharashtra Politics : ‘भाजपसह शिंदे गटालाही अजित पवारांचे खोचक टोले ; म्हणाले…

आयपीएस अधिकारी डी रुपा मुदगील यांनी आयएएस रोहिणी सिंदुरी यांच्यावर भ्रष्टाचारासह इतर अधिकाऱ्यांना स्वत:ची खाजगी फोटो पाठवल्याचा आरोप केला आहे.

.. तर त्यांचे हात-पाय तोडू; Bacchu Kadu यांचा खणखणीत इशारा

यामध्ये भूमी अभिलेख विभागातील अधिकाराचा गैरवापर, रिअल इस्टेटमधील घराणेशाही, अघोषित मालमत्ता आणि आयएएस अधिकारी डीके रवी यांच्या गूढ मृत्यूमध्ये त्यांची भूमिका अशा आरोपांचा समावेश आहे.

Rohit Pawar : कोश्यारी आता काही बोलतील, कोणीही विश्वास ठेवू नये

याबाबत या दोन्ही अधिकाऱ्यांनी एकमेकांविरोधात सोशल मीडियावर आरोपांचा वर्षाव केला होता. वरिष्ठ आयएएस अधिकारी डीके रवी यांच्या आत्महत्येमध्ये (DK Ravi Suicide Case) आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी यांच्या भूमिकेबद्दल आयपीएस अधिकारी डी रूपा यांनी संशय व्यक्त केला होता.

त्यानंतर डीके रवी यांच्या पत्नी कुसुमा हनुमंतरायप्पा (Kusuma Hanumantharayappa) यांनी त्यांच्या पतीच्या आत्महत्येबाबतच्या सीबीआयच्या अहवालात जबाबदार व्यक्तींची नावे असल्याची प्रतिक्रिया दिली होती.

आमदार-खासदारांचे रेटकार्ड राऊतांनी केले जाहीर; म्हणाले, त्यांना विकत घेण्यासाठी..

दरम्यान, डी रूपा यांनी लावलेल्या 19 आरोपांपैकी सिंधुरी आणि रवी यांच्या 2015 मध्ये आत्महत्येपूर्वी झालेल्या वैयक्तिक चॅटचा संदर्भ देखील दिला होता. सिंधुरी यांनी हे सर्व आरोप नाकारले आहेत आणि त्यांनी डी रुपा यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Tags

follow us