आमदार-खासदारांचे रेटकार्ड राऊतांनी केले जाहीर; म्हणाले, त्यांना विकत घेण्यासाठी..

आमदार-खासदारांचे रेटकार्ड राऊतांनी केले जाहीर; म्हणाले, त्यांना विकत घेण्यासाठी..

मुंबई – राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) रोज खळबळजनक दावे करणाऱ्या खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आणखी एक असाच दावा केला आहे. ‘नगरसेवक विकत घेण्यासाठी दोन कोटी,आमदारांसाठी 50 कोटी रुपये तर खासदारासाठी 75 कोटी रुपये आणि शाखाप्रमुख विकत घेण्यासाठी 50 लाख रुपये आहेत. यासाठी एक एजंटही नियुक्त करण्यात आला आहे असा गंभीर आरोप त्यांनी शिंदे गटावर केला आहे. हा पैसा नेमका येतो कुठून ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना थेट रेटकार्डच जाहीर केले. शिंदे गटाकडून ठाकरे गटातील आमदार-खासदार आणि अन्य पदाधिकाऱ्यांना खरेदी करण्यासाठी किती रुपये दिले जात होते, याचा दावा राऊतांनी यावेळी केला.

वाचा : Sanjay Raut : शिवसेना नावासह धनुष्यबाणासाठी 2 हजार कोटींचा सौदा

ते म्हणाले,की मी दोन हजार कोटींच्या व्यवहाराबाबत जे काही बोललो त्याची मला पूर्ण कल्पना आहे. गेल्या पाच महिन्यात दोन हजार कोटींचे पॅकेज वापरण्यात आले. याचे काय परिणाम होणार आहेत याची मला पूर्ण कल्पना आहे. म्हणूनच आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

संजय राऊत भडकले.. म्हणाले कोश्यारी खोटारडे; १२ आमदारांच्या मुद्द्यावर दिले प्रत्युत्तर

या देशात, राज्यात कधी रेटकार्ड तयार झालं नव्हतं. त्यांनी रेटकार्ड तयार केलं होतं. नगरसेवकासाठी २ कोटी, आमदारासाठी ५० कोटी, खासदार ७५ कोटी, शाखाप्रमुखासाठी ५० लाख असं रेटकार्ड आहे. एक रेटकार्ड तयार करून त्यासाठी एजंटदेखील नियुक्त केले आहेत. हे एजंट लोकांना तोडण्यासाठी कमिशनवर काम करत आहेत. हे असं देशात पहिल्यांदा होत आहे. आता ईडी कुठे आहे ?, आयकर विभाग कुठे आहे ? त्यांच्याकडे अशी कोणती विचारसरणी आहे ज्यासाठी हे सगळं सोडून ते जात आहेत ?असे सवाल त्यांनी केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube