Download App

Karnataka Politics : ‘सरकार पडणार’; भाजप नेत्याच्या दाव्याने काँग्रेसमध्ये खळबळ!

Karnataka Politics : कर्नाटकात भाजपला चारीमुंड्या चीत करत काँग्रेसने (Karnataka Politics) बहुमताने सरकार स्थापन केले. त्यामुळे आता भाजपाला (BJP) सरकार पाडण्याचा डाव खेळता येणार नाही या विचारात काँग्रेस असतानाच भाजपाच्या नेत्याच्या एका वक्तव्याने खळबळ उडाली आहे. राज्यात काँग्रेसचे (Congress) 45 आमदार आपल्या संपर्कात असल्याचे वक्तव्य भाजप संघटन सचिव बी.एल. संतोष यांनी केले होते.

संतोष यांच्या दाव्यानंतर कर्नाटकच्या राजकारणात (Karnataka Politics) खळबळ उडाली आहे. सरकार पाडण्याचा अनुभव काँग्रेसने घेतला आहे. त्यामुळे काँग्रेस नेते सतर्क झाले आहेत. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D. K. Shivkumar) यांनी उपरोधिकपणे सांगितले की संतोष यांनी सर्व काँग्रेस आमदारांशी संपर्क साधला, तर आम्हाला आनंदच होईल. अन्न नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनियप्पा म्हणाले की, संतोष यांनी त्यांच्या नेतृत्वात पक्षाच्या पराभवामुळे निराश होऊन हे विधान केले आहे.

Eknath Khadse : राजकारणातली मोठी चूक कोणती? नाथाभाऊंनी बेधडक सांगितलं

राज्य सरकार पडणार या भ्रमात भाजप आहे. ‘ऑपरेशन कमळ’ ची आम्हाला (Karnataka Politics) नेहमीच काळजी असते. पण, आता राज्यात तशी परिस्थिती नाही, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले.  राज्य सरकारमधील आणखी एक मंत्री प्रियांक खर्गे यांनीही भाजपवर जोरदार टीका केली. ऑपरेशन कमळसाठी पैसा येतो तरी कुठून याचे उत्तर संतोष यांनी द्यावे, असे आव्हान खर्गे (Priyank Kahrge) यांनी द्यावे. तुम्हाला एक दिवस नाही तर महिनाभर देऊ. 45 कशाला फक्त चारच आमदार फोडून दाखवा. येदियुरप्पा यांना संतोष यांनीच तिकीट दिले नाही त्याचेही उत्तर त्यांनी द्यावे, असे मंत्री खर्गे म्हणाले.

भाजपने आखलाय दक्षिण प्लॅन

देशभरात आता लोकसभा निवडणुकांचे (Karnataka Politics) वारे वाहत आहेत. भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. यावेळेस भाजपाने दक्षिणेतील राज्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. वेगळा प्लॅन तयार केला आहे. उत्तरेतील हिंदी पट्ट्यातील राज्यांतील जागांचे नुकसान दक्षिणेतून भरून काढण्याचा भाजप नेत्यांचा विचार आहे. त्यामुळे भाजप नेते दक्षिणेतील राज्यांकडे विशेष लक्ष देत आहेत. त्यानुसार कर्नाटकात (Karnataka) महत्वाच्या पदांवर थेट केंद्रीय मंत्र्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. फक्त कर्नाटकच नाही तर आंध्र प्रदेश आणि तेलंगाणा या राज्यांवरही भाजप नेतृत्वाने लक्ष केंद्रीत केले आहे.

Karnataka Politics : पराभवानंतर भाजपाचा टॉप गिअर; थेट केंद्रीय मंत्र्यांनाच धाडले राज्यात

Tags

follow us