Priyank Kharge On Pm Modi : काँग्रेस (Congress)अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्यानंतर त्यांचा मुलगा प्रियांक खरगे (Priyank Kharge)यांनीही पंतप्रधान मोदींवर (Pm Modi)आक्षेपार्ह विधान केलं आहे. प्रियांक खरगे यांनी पीएम मोदींवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, असा नालायक मुलगा असेल तर देश कसा चालेल? (How will the country run if there is a worthless son?) याआधी मल्लिकार्जुन खरगेंनीही पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह टीका केली होती, त्यावरून जोरदार गदारोळ सुरू आहे.
वडील गेले तरी डोळ्यात पाणी नाही, पराभव लागला जिव्हारी, सुहास कांदे झाले भावुक
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचे चिरंजीव आणि माजी मंत्री प्रियांक खरगे म्हणाले की, मोदी मालखेड्यात आल्यावर बंजारा समाजाला (Banjara community) काय म्हणाले? बंजारा समाजाचा मुलगा दिल्लीत आहे, पण असा मुलगा असेल तर चालेल कसे? तो देश चालवत नाही. त्यावर प्रियांक खरगे म्हणाले की, घरात नालायक मुलगा असला तरी घर सुरळीत चालत नाही.
पंतप्रधान मोदी कधीही रडले नाहीत, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे. गेली नऊ वर्षे काँग्रेसच रडत असल्याचे ते म्हणाले. वास्तविक CryPMPayCM नावाची मोहीम सोशल मीडियावर सुरू आहे. ही मोहीम काँग्रेसने चालवली असून पंतप्रधान मोदी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना लक्ष्य केले आहे.
याबद्दल माध्यमांनी बसवराज बोम्मई यांना विचारले असता ते म्हणाले की, पंतप्रधान कधी रडले नाहीत. काँग्रेसच गेली नऊ वर्षे रडत आहे, आणि ती इतकी रडली आहे की, त्यांच्या डोळ्यांतून अश्रू सुकले आहेत आणि लोकांनाही आता त्यांच्याबद्दल सहानुभूती राहिलेली नाही अशी टीका मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कॉंग्रेसवर केली आहे.