वडील गेले तरी डोळ्यात पाणी नाही, पराभव लागला जिव्हारी, सुहास कांदे झाले भावुक
Suhas Kande Emotional : नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या गटाने 18 पैकी 16 जागा जिंकत नांदगाव बाजार समितीवर एकहाती सत्ता आणली. त्यांनी महाविकास आघाडीच्या गटाचा सुपडा साप केला. परंतु या निवडणुकीत सुहास कांदे गटाचे सुहास आहेरांचा महाविकास आघाडीच्या गटाचे अमित बारसेनी पराभव केला. यावेळी आमदार सुहास कांदे बोलताना भावुक झाले. ते म्हणाले ‘गड आला पण सिहं गेला’. माझे वडील गेले तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं नव्हतं पण आज हा पराभव माझ्या खूप जिव्हारी लागला आहे. यावेळी सुहास कांदे म्हणाले ते नाशिक येथे पत्रकारांशी बोलत होते.
पुढे बोलताना कांदे म्हणतात आमच्या पॅनलचे सर्वेसर्वा आणि चालक विलास आहेर यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच आमचे दुसरे उमेदवार विजू भाऊ यांचा फक्त चार मताने पराभव झाला. मी माझ्या सर्व मतदार बांधवांचे आभार मानतो तसेच सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.
देशात घटस्फोट घेणं सोपं का नाही? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं ‘हे’ बदलणार
ही निवडणूक सुहास कांदे विरुद्ध माजी सहा आमदार अशी झाली असे विचारले असता कांदे म्हणतात मी या सर्व आमदारांना आव्हान देतो आम्ही सर्व विकासाच्या माघे धावणारे आहोत. मतदार देखील विकासाच्या माघे धावणारे आहे. ही निवडणूक आमचे विलास भाऊ जे पराभूत झाले ते म्हणजे केवळ आगितले निखारे होय. मो या आमदारांना अजिबात घाबरत नाही या आमदारांनी पुन्हा एकदा एकत्र यावे. आणि माझ्या विरोधात निवडणूक लढवावी तर मी एकटा यांचा पराभव करेल.