Download App

गणेश विसर्जन मिरवणुकीत भीषण अपघात; ट्रकने चिरडल्याने आठ जण जागीच ठार

Karnataka truck Accident कर्नाटकमधील हासन जिल्ह्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रक घुसल्याने भीषष अपगात झाला. यामध्ये आठ जण जागीच ठार झाले.

  • Written By: Last Updated:

Karnataka truck Accident in Ganesh Visarjan Rally 8 dead : गणेश विसर्जनाच्या दिवशी एक भीषण दुर्घटना घडल्याचा समोर आला आहे. विसर्जन मिरवणुकीमध्ये एक ट्रक घुसल्याने आठ लोकांचा मृत्यू तर 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ही दुर्घटना कर्नाटकमधील हासन जिल्ह्यामध्ये घडली आहे.

मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

तसेच या अपघातामध्ये गंभीर जखमी असलेल्या आठ लोकांची प्रकृती चिंताजनक आहे. यावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या घटनेची माहिती घेत अपघातग्रस्त आणि मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत करण्याची घोषणा दिली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री आठ वाजून 45 मिनिटांच्या दरम्यान घडली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट करत याबाबत संवेदना व्यक्त केल्या आहेत.

सुख, संपत्ती अन् संतती कोणत्या राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?

या अपघातातील मृतांमध्ये जास्त तरुणांचा समावेश आहे. तर विसर्जन मिरवणुकीत घुसणारा हा ट्रक अरकलागुडू याठिकाणहून येत होता. मात्र हासन या ठिकाणी येत असताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रक थेट विसर्जन मिरवणुकीमध्ये घुसला. यावेळी त्यांनी अनेकांना चिरडलं. यामधील आठ जण जागीच ठार झाले आहेत. तर दिसून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. हे ट्रक चालकाचे नाव भुवनेश असून अपघात होताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र उपस्थित आहेत कंपनीचा आहे.

follow us