Download App

हुंड्यात BMW कार, 150 ग्रॅम सोनं अन् 15 एकर जमीन; लग्न मोडल्यानं डॉक्टर तरुणीनं संपवलं आयुष्य

Kerala News : विवाहातील हुंड्याची समाजविघातक प्रथा अजूनही आपल्या समाजातून गेलेली नाही. गाव खेड्यातील अशिक्षित लोकच नाही तर आता अगदी उच्चशिक्षित अन् स्वतःला पुढारलेले म्हणवून घेणारे लोकही या प्रथेच्या आहारी गेले आहेत. याचं प्रथेला आणखी बळकट करणारी आणि उच्च शिक्षित डॉक्टर तरुणीचा बळी घेणारी घटना केरळ राज्यात उघडकीस आली आहे. येथील तिरुअनंतपूरम (Kerala News) शहरातील एका 26 वर्षीय डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

या तरुणीच्या प्रियकराने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. याचे कारण आता समजले आहे. तरुणीचे कुटुंबिय हुंडा देऊ शकले नाहीत म्हणून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. आता या घटनेची दखल राज्य सरकारने घेतली असून आरोग्यमंत्री वीना जॉर्ज यांनी डॉ. शहानाच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. डॉ. शहाना तिरुवनंतपूरम शहरातील सरकारी मेडिकल कॉलेजमधील सर्जरी विभागातूम पोस्ट ग्रॅज्यूएशनचे शिक्षण घेत होती.

Kerala : निपाह व्हायरसची धास्ती! केरळमध्ये दोन रुग्ण दगावले, केंद्राचं पथक दाखल..

या प्रकरणी पोलिसांनी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मयत महिलेच्या कुटुंबियांचे जबाबही पोलिसांनी नोंदवले आहेत. स्थानिक मीडियानुसार, डॉ. शहाना तिच्या आई आणि भावा बहिणीसोबत राहत होती. तिचे वडिलांचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. डॉ. ईए रुवैसबरोबर ती रिलेशनशीपमध्ये होती आणि दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

या घटनेनंतर डॉ. शहानाच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की प्रियकराच्या परिवाराने त्यांच्याकडे 150 ग्रॅम सोने, 15 एकर जमीन आणि एक बीएमडब्ल्यू कारची मागणी केली होती. स्थानिक वृत्तपत्र मातृभूमिमधील वृत्तानुसार, ज्यावेळी डॉ. शहानाचे कुटुंबियांनी ही मागणी पूर्ण करू शकत नसल्याचे कळवले त्यावेळी प्रियकराच्या कुटुंबाने हे लग्न मोडून टाकले. स्थानिक नागरिकांनी सांगितले की यामुळे डॉक्टर तरुणी प्रचंड मानसिक तणावात गेली आणि तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. आता अशी माहिती समोर आली आहे, की या डॉक्टर महिलेच्या अपार्टमेंटमधून सुसाइड नोट समोर आली आहे. यात लिहिले आहे की आज प्रत्येकजणाला फक्त पैसाच पाहिजे आहे.

Kerala : नाव बदलाचं लोण आता दक्षिण भारतात; केरळच्या नावात होणार लवकरच बदल

केरळ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा पी. सतीदेवी यांनी डॉ. शहाना यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली. जर हुंड्याच्या कारणामुळे डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली असेल तर या प्रकरणात राज्य सरकारने नक्कीच आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. या घटनेने शहरात मात्र मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.

Tags

follow us