Download App

खर्गे हे नावापुरतेच कॉंग्रेसचे अध्यक्ष, रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्याच हाती; पंतप्रधान मोदींची टीका

  • Written By: Last Updated:

बेळगावी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज बेळगावी येथे एका सभेला संबोधित करतांना काँग्रेसवर सडकून टीका केली. छत्तीसगडमधील अधिवेशनादरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि कर्नाटकला कॉंग्रेसने अपमानित केल्याचा आरोप मोदींनी केला. ते म्हणाले, मी मल्लिकार्जुन खर्गेंचा (Mallikarjun Kharge) खूप आदर करतो. रायपुरमध्ये काँग्रेसचे जे अधिवेशन सुरू होते, त्यात खर्गे सर्वात ज्येष्ठ नेते होते. ऊन तापत होतं. पण खरगेजींना उन्हात छत्रीचं भाग्य लाभले नाही, ती छत्री दुसऱ्याच कुणासाठी होती. खर्गे हे केवळ नावापुरतेच काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात आहे हे सर्वांना माहीत आहे, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर टीका केली.

 

नेहरू-गांधी घराण्याची खिल्ली उडवत मोदी म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षांची ज्येष्ठता आणि वय असूनही खर्गेंचा पक्षाकडून अपमान आणि अनादर करण्यात आला. यावरून कॉंग्रेस पक्ष हा फक्त नेहरू-गांधी कुटुंबाचा असल्याचं दिसतं. त्यामुळे कॉंग्रेस हा पक्ष नसून परिवार असल्याची ते म्हणाले. कर्नाटकातील नेत्यांचा अपमान करणे हा काँग्रेसच्या जुन्या संस्कृतीचा भाग आहे, अशी टीकाही त्यांनी केली. ते म्हणाले की, ‘काँग्रेस परिवार’ ज्या नेत्यावर नाराज असतो, त्या नेत्यांचा त्यांच्याच कॉंग्रेसमध्ये त्यांचा अनादर सुरू होतो. एस. निजलिंगप्पा, वीरेंद्र पाटील यांच्यासारख्या नेत्यांचा कॉंग्रेसने अपमान केल्याचा इतिहास साक्षी आहे. हे कर्नाटकातील सर्वांना माहीत आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा कर्नाटकातील आणखी एका नेत्याचा कॉंग्रेस परिवारातील निष्ठावंतांकडून अपमान करण्यात आला आहे.

40 गद्दार आमदारांनी आईच्याच पाठीत खंजीर खुपसला; ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांची टीका

पीएम मोदी म्हणाले, या मातीचे सुपुत्र मल्लिकार्जुन खर्गे यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. त्यांना जवळपास 50 वर्षांचा संसदीय आणि विधिमंडळाचा अनुभव आहे. त्यांनी त्या लोकांच्या सेवेसाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, छत्तीसगडमधील काँग्रेस अधिवेशनादरम्यान त्यांच्याशी झालेली वागणूक पाहून मला खूप वाईट वाटले. खर्गे पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि वयाने मोठे आहेत.

छत्तीसगडमधील काँग्रेस अधिवेशनादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खर्गे यांना छत्रीचे सौभाग्य लाभले नाही आणि छत्री ही दुसऱ्यासाठी होती. यावरून खर्गे हे केवळ नावापुरतेच काँग्रेसचे अध्यक्ष असून त्यांना ज्या पद्धतीने वागणूक दिली जात आहे, ते पाहता रिमोट कंट्रोल कोणाच्या हाती आहे, हे प्रत्येकाला समजू शकते, असा टोलाही त्यांनी लगावला.

Tags

follow us