Kiren Rijiju on Congress : लोकसभेत केंद्र सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी विरोधकांवर ताशेरे ओढले. हा प्रस्ताव चुकीच्या वेळी आणल्याबद्दल काँग्रेसला (Congress) नक्कीच पश्चाताप होईल, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर देशाची दिशाभूल केल्याचा आरोपही केला. तसेच, नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पंतप्रधान झाल्यानंतर, ईशान्येमध्ये 8000 हून अधिक दहशतवादी / अतिरेकींनी आत्मसमर्पण केल्याचं ते म्हणाले. (Kiren Rijiju on Congress Over motion of no confidence)
किरेन रिजिजू यांनीही यावेळी विरोधी आघाडीच्या नावावर टीका केली. ते म्हणाले, तुम्ही देशाच्या विरोधात काम करत आहात, त्यामुळे आघाडीला I.N.D.I.A असे नाव देऊन काही होणार नाही. हा अविश्वास ठराव फेटाळल्यानंतर आम्ही नवीन संसद भवनात स्थलांतरित होऊ. या जुन्या संसद भवनात हा शेवटचा अविश्वास प्रस्ताव अपयशी ठरल्याच्या घटनेचे आम्ही साक्षीदार होऊ. अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी काहीतरी कारण असावे. काँग्रेसला पुढं नक्कीच याचा पश्चाताप होईल, अशी टीका त्यांनी केली.
अमेरिकन खासदार 15 ऑगस्टला पाहुणे: आजोबा होते स्वातंत्र्यसैनिक, गांधीजींसोबत तुरुंगातही गेले
रिजिजू पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून दहशतवादावर मोठ्या प्रमाणात अंकुश आला. ईशान्येत 8,000 हून अधिक दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले. AFSPA चे एकूण कव्हरेज क्षेत्र 75% ने कमी केले आहे. तुम्ही मणिपूरबद्दल बोलत असाल तर सर्व तथ्य तपासा, अन्यथा तुम्ही देशाची दिशाभूल करत आहात, असंही ते म्हणाले.
मणिपूर हिंसाचारावरून कॉंग्रेसने कायम भाजप आणि मोदींवर टीका केली. याचाही समाचार रिजिजू यांनी घेतला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, 2014 पूर्वी, ईशान्येकडील अनेक लोकांना दिल्ली आणि देशातील इतर मोठ्या शहरांमध्ये जातीय भेदभाव आणि अत्याचारांचा सामना करावा लागयचा. 2014 नंतर परिस्थिती बदलली आणि स्वातंत्र्यानंतर प्रथमच गुवाहाटीमध्ये डीजीपी परिषद आयोजित करण्यात आली. या बैठकीदरम्यान पोलिसांनी ईशान्येकडील लोकांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश पंतप्रधानांनी दिले. भारताने काय करावे आणि काय करू नये हे परकीय शक्तींनी सांगण्याचचे दिवस गेले. आज कोणतीही विदेशी शक्ती आपल्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, असेही रिजिजू म्हणाले.