Noel Tata : रतन टाटा यांच्या निधनानंतर (Ratan Tata) टाटा समूहाची धुरा कुणाच्या हाती जाणार असा प्रश्न विचारला जात होता. या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची (Noel Tata) अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. नोएल टाटा आधीपासूनच टाटा ट्रस्टचे विश्वस्त (Tata Trust) आहेत. आता त्यांना थेट अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या नावावर सगळ्यांची सहमती होती. आता अध्यक्षाच्या रुपात नोएल टाटा यांचा नवा कार्यकाळ सुरू झाला आहे. याच निमित्ताने जाणून घेऊ या की कायम लाइमलाइटपासून दूर असलेले नोएल टाटा कोण आहेत..
नोएल टाटा यांचा जन्म 1957 मध्ये झाला होता. नोएल टाटा भारतीय वंशाचे आयरिश व्यापारी आहेत. आता टाटा ट्रस्टचे अध्यक्षही झाले आहेत. त्यांच्या सुरुवातीच्या जीवन काळाचा विचार केला तर त्यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण ससेक्स विद्यापीठात झालं आहे. यानंतरच शिक्षण त्यांनी फ्रान्समध्ये घेतलं. टाटा इंटरनॅशलमधून नोएल टाटा यांनी आपल्या करिअरला सुरूवात केली. विदेशात पाठवली जाणारी विविध उत्पादने आणि सेवांसाठीची ह एक कंपनी आहे.
मोठी बातमी : नोएल नवल टाटा संभाळणार टाटा ट्रस्टची कमान; अध्यक्षपदी एकमताने निवड
सद्यस्थितीत ते ट्रेंट, टाटा इनवेस्टमेंट कॉर्पोरेशन, टाटा इंटरनॅशनलचे निदेशक आणि टायटन कंपनीचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. टाटा समूहातील अनेक कंपन्यांची होल्डींग कंपनी टाटा सन्स मध्ये टाटा ट्रस्टची 66 टक्के हिस्सेदारी नोएल टाटा यांच्याकडेच आहे. ते टाटा स्टीलचे व्हाइस चेअरमन आणि सर रतन टाटा ट्रस्टच्या बोर्डातही ते आहेत.
रतन टाटा आयुष्यभर अविवाहित राहिले. त्यामुळे त्यांचा कुणी वारसदार नाही. त्यांचे लहान बंधू जिमी टाटा देखील लाइमलाईट पासून दूर राहतात. जिमी टाटा देखील टाटा समूहात हिस्सेदारी ठेवतात. जिमी टाटा यांनी देखील लग्न केलं नाही. त्यामुळे त्यांचाही कुणी वारसदार नाही. नोएल टाटा टाटा ट्रस्टचे सर्वात श्रीमंत अध्यक्ष ठरले आहेत. याचं कारण म्हणजे नोएल टाटा स्वतः टाटा समुहाच्या अनेक कंपन्यांत भागीदार आहेत. अन्य सदस्यांच्या तुलनेत जास्त सक्रिय आहेत. त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्य देखील समुहातील अन्य कंपन्यांत काम करत आहेत.