Download App

Kolkata Airport Fire: कोलकाता विमानतळावर आगीची दुर्घटना टळली, प्रवाशांची धावपळ

Kolkata Airport Fire : कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी (14 जून) रात्री आग लागली. टर्मिनलच्या आतील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी विमानतळ अधिकारी पोहोचल्यानंतर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आग आटोक्यात आणण्यात आली आहे.

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता आहे. सकाळी 9.12 च्या सुमारास ही आग लागली, त्यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सांगितले की, नेताजी सुभाष चंद्र बोस इंटरनॅशनल (NSCBI) विमानतळ कोलकाता चेक-इन एरिया पोर्टल डी येथे रात्री 9.12 च्या सुमारास किरकोळ आग आणि धूर झाला. रात्री 9.40 पर्यंत नियंत्रणात आणण्यात आले. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून चेक-इन परिसरात धुराचे लोट आढळल्याने ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. कामकाज आता पुन्हा सुरू झाले आहे.

Tags

follow us