Kolkatta Rape Murder Case : पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्त्यामध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरची रुग्णालयातच बलात्कार करुन अमानवी पद्धतीने हत्या (Kolkatta Rape Murder Case) केल्याची घटना घडलीयं. गुरुवार दि. 8 ऑगस्ट रोजी पीडित महिलेचा मृतदेह रुग्णालयात आढळून आला. या धक्कादायक प्रकारानंतर एसआयटीमार्फत तपास करण्यात आला. तपासाअंती पीडित महिलेच्या नखांमध्ये असलेलं रक्त, हेडफोनवरुन पोलिसांनी हत्येचा उलगडा करत आरोपी संजय रॉय याला जेरबंद केलंय.
मी शरद पवारांसोबत…पवारसाहेब मोदींकडून अनेक गोष्टी करुन घेऊ शकतात; विनोद तावडे
नेमकं प्रकरण काय?
पीडित महिला आरजी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर होती. आरोपी संजय रॉय हा पेशाने स्वयंसेवक आहे. गुरुवारी 8 ऑगस्टला पीडित महिला कर्तव्यावर असताना तिच्या अज्ञाताकडून बलात्कार करण्यात आला. पीडित महिला रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या सेमिनार हॉलमध्ये झोपलेली असताना आरोपीने तिच्यावर जबरदस्ती करण्याच प्रयत्न केला. यावेळी पीडित महिलेकडून प्रतिकार झाला पण नराधम या कृत्यात यशस्वी झाला. हा नराथम बलात्कारापर्यंतच थांबला नाही तर त्याने बलात्कारानंतर पीडित महिलेची आरोपीने अमानवी पद्धतीने हत्या केलीयं. आरोपीने पीडितेचा गळा घोटून तिची हत्या करण्यात आली.
या हत्येनंतर पश्चिम बंगालमध्ये सर्वच राजकीय पक्षांकडून निषेध करण्यात आला. आरोपीला तत्काळ अटक कडक कारवाईची मागणी जोर धरु लागली. या प्रकारानंतर पश्चिम बंगाल सरकारकडून महिलेचं बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पोलिस पथक (एसआयटी) ची स्थापना करण्यात आली.
विधानसभेत भाजप ‘इतक्या’ जागांवर निवडणूक लढवणार, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
डोळे, तोंड अन् प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव
बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर पीडित महिलेचा मृतदेह आढळून आला. ही घटना कोलकत्यात पसरताच नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आल्याचं दिसून आलं. पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा करुन महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदनाच्या अहवालानूसार पीडित महिलेचे डोळे, तोंड, प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव तसेच पोटावर, मानेवर, हाताला आणि ओठांवर जखमा असल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे आरोपी नराधमाने या महिलेची मानही मोडली होती.
एसआयटीच्या पथकाला घटनास्थळावर एक ब्लूटूथ हेडफोन मिळालं होतं. हे ब्लूटूथ हेडफोन सीसीटीव्ही फुटेजमधील एका व्यक्तीकडे दिसून आलं होतं. एवढंच नाही तर पीडित महिलेच्या नखांमध्ये आरोपीच्या त्वचेचं मांस आणि रक्त लागल्याचं दिसून आलं. याच आधारावर एसआयटीने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी करत घराची झाडाझडती घेतली. यावेळी पोलिसांना आरोपीच्या बुटाला रक्ताचे डाग असल्याचं दिसून आलं. हे रक्ताचे डाग आरोपीने नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र, पोलिसांना अंधूक स्वरुपात हे डाग आढळून आल्याने पोलिसांना खात्री पटली.
दरम्यान, संजय रॉय असं या आरोपीचं नाव असून या घटनेत अन्य आरोपींचा समावेश आहे का? आरोपीने पीडित महिलेची बलात्कार करुन हत्या का केली? यांसह अनेक प्रश्नांची उत्तरांचा शोध पोलिसांच्या विशेष पथकाकडून सुरु आहे. मात्र, रुग्णालयासारख्या ठिकाणीच महिलांबाबत अशा घटना घडत असतील तर इतर ठिकाणी महिला कशा सुरक्षित असतील? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.