Download App

एकीकडं PM मोदींची विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा, दुसरीकडं विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल

Kota Student Suicide Case : आगामी काळात दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा (Board Exam)होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून संवाद साधला. त्यात पीएम मोदींनी विद्यार्थ्यांना ताणतणाव न घेण्याचा सल्ला दिला. या चर्चेत पंतप्रधान विद्यार्थी आणि पालकांना सल्ला देत असतानाच राजस्थानमधील (Rajasthan)कोटा शहरातून आणखी एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. कोटा येथे जेईई मेनची तयारी करत असलेली बारावीची विद्यार्थिनी निहारिका सिंहने (Niharika Singh)आपली जीवनयात्रा संपवली आहे.

Vikhe Vs Shinde : लोकसभा उमेदवारीवरून शिंदे विखेंना डिवचतायत का?, कोण असेल भाजपचा उमेदवार?

जेईई मेन्सचा पेपर उद्या 30 जानेवारीला होणार होता. त्याआधीच तिनं हे पाऊल उचललं आहे. ही घटना बोरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आहे. निहारिकाच्या खोलीत एक सुसाईड नोट देखील सापडली आहे, त्यात तिने लिहिलंय की, आई-बाबा मला माफ करा, मी जेईईची तयारी करु शकले नाही, त्यामुळेच मी हे पाऊल उचलत आहे.

आता मदरशांमध्ये रामायण शिकवले जाणार, वक्फ बोर्डाचा मोठा निर्णय

बोरखेडा पोलीस ठाण्याचे एएसआय रेवतीरामन यांनी सांगितले की, शिवमंदिर 120 फूट रोड बोरखेडा येथील रहिवासी विजय सिंह यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांची मुलगी निहारिका ही 18 वर्षांची होती. बारावीत शिकत होती. तिचा जेईई ॲडव्हान्सचा पेपर उद्या मंगळवारी (दि.30) होणार होता. त्याआधीच तिने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

follow us