Download App

KRK : राहुल हे भारतीय जनतेचे सर्वात आवडते राजकारणी याचा ‘हा’ पुरावा

  • Written By: Last Updated:

karnatak asembly election update 2023 : 10 मे रोजी झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या (Karnataka Legislative Assembly) 224 जागांसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीला आज पार पडली. संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले होते. प्रत्येक निवडणुकीत सत्ताबदल करण्याची कर्नाटकची 39 वर्षांची परंपरा आहे. यंदाही कर्नाटकने आपली परंपरा कायम राखल्याचं हाती आलेल्या निकालावरून दिसतं आहे. यंदा कॉंग्रेसने (Congress) एकहाती सत्ता मिळवत भाजपचा सुपडासाप केला. काँग्रेसने कर्नाटकमध्ये 136 जागा जिंकत इतिहास रचला आहे. तर केंद्रात सत्तेत आणि कर्नाटकमध्ये सत्तेत असणाऱ्या भाजपला केवळ 64 जागांवर समाधान मानावे लागले.

याचं श्रेय जातं राहुल गांधीना. 51 विधानसभा मतदारसंघात राहुल गांधींची (Rahul Gandhi’s) भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra)गेली होती, त्यातील 38 विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळवला आहे. तसेच राहुल गांधींनी कर्नाटकमध्ये 22 रॅली केल्या आणि त्याचा विजयी स्ट्राइक रेट 68% आहे आणि तो इतर सर्व राजकारण्यांपेक्षा जास्त आहे. मोदीजींनी 42 रॅली केल्या आणि त्यांचा विजयी स्ट्राइक रेट फक्त 40% आहे! आज राहुल हे भारतीय जनतेचे सर्वात आवडते राजकारणी आहेत याचा हा पुरावा आहे. असे फिल्म अभिनेता कमल R खान याने ट्विट करत म्हंटल आहे.

राहुल गांधींनी काढलेल्या भारत जोडो यात्रेला कर्नाटकात चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याचा परिणाम कर्नाटक निवडणुकीच्या निकालात दिसून आला आहे. राहुल गांधी यांनी मोदी यांच्या विरोधात कर्नाटकात गेल्या निवडणुकीत वक्तव्य केले होते. त्यामुळे न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे राहुल यांना खासदारकी गमवावी लागली होती. खासदारकी गमवल्यानंतर राहुल यांनी कर्नाटकात जोरदार प्रचार केला. त्यांच्या सभांनाही कर्नाटकात चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे राहुल गांधी हे भारतातील सर्वाधिक आवडते राजकारणी बनले आहेत .

Tags

follow us