Download App

BJP नेत्यांसमोरच कुमार विश्वास यांची संघावर टीका; म्हणाले, आरएसएस निरक्षर

  • Written By: Last Updated:

उज्जैन : उज्जैनमध्ये रामकथा सांगण्यासाठी आलेले प्रख्यात हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास (Dr. Kumar Vishwas) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) आणि डाव्या विचारसरणीला निरक्षर म्हटले. अर्थसंकल्पावर बोलताना कुमार विश्वास यांनी हे संघावर ही टिप्पणी केली आहे. त्यांचे संघावर केलेली टिप्पणी ऐकून कार्यक्रमाला उपस्थित असलेले लोक हसले आणि त्यांनी कुमार विश्वास यांच्या टिप्पणीवर टाळ्या वाजवल्या.

उज्जैनच्या कालिदास अकादमी परिसरात विक्रमोत्सवाअंतर्गत रामकथा आयोजित करण्यात आली होती. यावेळी कुमार विश्वास बोलत होते. या कार्यक्रमाला राज्यमंत्री मोहन यादव, खासदार अनिल फिरोजिया, आमदार पारस जैन यांच्यासह महापौर मुकेश टटवाल उपस्थित होते.

विक्रमोत्सव कार्यक्रमांतर्गत 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान 3 दिवसीय रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. कुमार विश्वास हे काल कथा सांगण्यासाठी आले होते. तेव्हा रात्री 8 वाजता त्यांना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने लोक कार्यक्रमाला पोहोचले होते. या कार्यक्रमात कथा सांगत असतांना कुमार विश्वास यांनी संघावर टीका केली.

यावेळी विश्वास कुमार यांनी एक किस्सा सांगितला. तो किस्सा सांगत असतांना ते म्हणाले, 3-4 वर्षांची गोष्ट आहे. देशाचे बजेट येणार होते. मी माझ्या घरच्या स्टुडिओत उभा होतो, एका मुलाने मोबाईल चालू केला. तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करणारा होता. त्याने मला बजेट कसे पाहिजे, असा सवाल केला. त्यावर मी म्हणालो की, तुम्ही रामराज्याचे सरकार बनवले आहे. त्यामुळे रामराज्याचा अर्थसंकल्प आला पाहिजे. तेव्हा त्याने रामराज्यात बजेट कुठे होते, असा सवाल केला.

त्यावर मी म्हणालो की, तुमची अडचण अशी आहे की डावे आणि तुम्ही अशिक्षित आहात. या देशात फक्त दोन लोकांमध्ये भांडण आहे. एक म्हणजे डावे, जे अशिक्षित आहेत, त्यांनी सर्व काही वाचले आहे, परंतु जे काही वाचलं ते सगळं चुकीचे वाचले आहे आणि दुसरा हे असे लोक ज्यांनी अजिबातच काही वाचले नाही.

…विरोधकांचे डोळे पांढरे झाले पाहिजे, सभेपूर्वी उद्धव ठाकरेंचा कानमंत्र

दरम्यान, त्यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता भाजपचे प्रदेश प्रवक्ते राजपाल सिसोदिया यांनी कुमार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी ट्विट करून कुमार विश्वास यांनी खडे बोल सुनावले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, कुमार विश्वास यांचे स्वागत करण्यासाठी यावे लागेल. तुम्ही उज्जैनला कथन करायला आला आहात तर कथनच करा, उगाच सर्टिफिकेट वाटत फिरू नका. शिक्षित लोकांनो, आमचे अशिक्षित लोक तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगले आहेत, असं ते म्हणाले.

Tags

follow us