Former SC Justice Markandey Katju On Lady Lawyer : कोर्ट रूममध्ये माझ्याकडे बघून डोळे मारणाऱ्या अथवा मिचकावणाऱ्या महिला वकिलांना अनुकूल आदेश मिळाल्याची वादग्रस्त पोस्ट सर्वोच्च न्यायालायचे (Supreme Court) माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू (Markandey Katju) यांनी केली आहे. त्यांच्या या पोस्टवरून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात असून, वाढता संताप व्यक्त होताच काटजू यांनी त्यांनी एक्सवरील पोस्ट डिलीट केली आहे. मात्र, त्यानंतरही त्यांची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याबाबत फ्रि प्रेस जरनलने वृत्त प्रकाशित केले आहे.
काटजू यांची पोस्ट नेमकी काय?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून डिलीट केलेल्या पोस्टमध्ये काटजू यांनी कोर्टात माझ्याकडे बघून डोळे मिचकावणाऱ्या किंवा मारणाऱ्या सर्व महिला वकिलांना अनुकूल आदेश मिळाल्याचे म्हटले आहे. काटजू यांचे अशाप्रकारे वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नसून, यापूर्वीही त्यांनी अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत. २०११ मध्ये सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झालेले न्यायमूर्ती काटजू राजकारण, कविता आणि तत्वज्ञान या विषयांवर वारंवार वादग्रस्त भूमिका घेण्यासाठी ओळखले जातात.
The tweet is deleted now.
All orders passed by him should be revisited. pic.twitter.com/Ia2lhLjhKY
— Adv MN Gopinadh (@GopinadhMN) August 20, 2025
काटजू यांच्या वादग्रस्त पोस्टनंतर यावर अनेक स्तरातून प्रतिक्रिया समोर येत असून, अनेक वकिलांनी आणि यूजर्सने काटजू यांचे विधान घृणास्पद आणि न्यायपालिकेचा अपमान करणारे असल्याचे म्हटले आहे. तर, एका वकिलाने काटजू यांच्या कार्याळात देण्यात आलेल्या सर्व आदेशांवर पुन्हा विचार करावा असे म्हटले आहे.
रस्त्यांवर खड्डे आहेत मग टोल देऊच नका; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राजू शेट्टीही आक्रमक
किरण बेदींपेक्षा इल्मी सुंदर
काटजू यांचा वादग्रस्त विधानांचा इतिहास त्यांच्या न्यायालयीन आणि निवृत्तीनंतरच्या काळापासून आहे. २०१५ मध्ये, काटजू यांनी म्हटले होते की, जर भाजपने किरण बेदींऐवजी सुंदर दिसणाऱ्या शाझिया इल्मीला उमेदवारी दिली असती तर दिल्ली निवडणुकीत चांगले प्रदर्शन झाले असते असे विधान केले होते. अलिकडेच काटजू यांनी कर्नाटकातील हिजाब वादापासून ते भारत-पाकिस्तान आणि बांग्लादेशच्या पुनर्मिलनापर्यंतच्या मुद्द्यांवर आपले मत व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला आहे.
251 खासदारांचे सदस्यत्व धोक्यात, नव्या विधेयकामुळे कोणत्या पक्षाला सर्वाधिक धोका ?
सर्वाधिक फॉलोअर्स असणारे माजी न्यायाधीश
२००६ मध्ये सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती होण्यापूर्वी काटजू यांनी मद्रास आणि दिल्ली उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे. २०११ मध्ये काटजू सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले आणि नंतर २०१४ पर्यंत ते प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते. काटजू यांचे एक्सवर जवळजवळ चार लाख आणि फेसबुकवर जवळपास नऊ लाख फॉलोअर्ससह असून, सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले काटजू माजी न्यायाधीशांपैकी एक आहेत.