तुम्ही घटना बदलणार आहे का ? तुम्ही सुप्रीम कोर्ट आहे का? सदाभाऊ खोतांनी जरांगेंना अंगावर घेतले !
Sadabhau Khot On Manoj Jarange: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarnage) हे आक्रमक झाले असून, शांतता रॅलीही त्यांनी काढली आहे. 20 जुलै रोजी ते पुढील भूमिका जाहीर करणार आहेत. मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. पण आता विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी मनोज जरांगे यांच्यावर थेट टीका करत त्यांना आता अंगावर घेतले आहे.
मुख्यमंत्री वारकरी महामंडळासाठी 50 कोटींची तरतूद; काय योजना राबविणार ?
आंदोलनांमध्ये राजकीय पोळी भाजविले जात असल्याचे म्हणत खोत म्हणाले, आरक्षणावरून आज गदारोळ चालला आहे. कुणी उठावे आणि आंदोलन करावे. ओबीसींच्या नेत्यांना म्हणावे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. मराठा आरक्षण आंदोलकांनी उठावे आणि आम्हाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, अशी मागणी केली जात आहे. कोणते सरकार आले तरी कुणाच्या आरक्षणातून कुणाला आरक्षण देण्याचे अधिकार कोणत्या सरकारला नाही. मी जबाबदारीने सांगतो. उद्या कुणीही उठेल आणि म्हणेल, मला एससी, एसटीमध्ये जायचा आहे. ती काय परड्यातील भाजी आहे का ? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे.
बारामतीतून फोन गेला याचा पुरावा आहे का ? सुप्रिया सुळेंचे भुजबळांना सणसणीत प्रत्युत्तर
परंतु या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा नावाखाली राजकारण केले जात आहे. राजकारणाची पोळी भाजण्यासाठी जातीचा इश्यु घेतात आणि नेता होतात. जनतेने हे डाव ओळखले पाहिजे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या माध्यमातून शरद पवार यांनी विधानसभा भाकरी भाजवून घ्यायची आहे. लोकसभेला भाकरी भाजून घेतली आहे. प्रत्येक नेता आता जाळ घालत आहे. त्या जाळातून एक जण नेता बनवून मी आरक्षण दिले शिवाय गप्प बसणार नाही, असे म्हणतोय. घटना तुम्ही लिहित आहे का ? तुम्ही घटना बदलणार आहे का ? तुम्ही सुप्रीम कोर्ट आहे का? असा सवालच सदाभाऊ खोत यांनी जरांगे यांनी उपस्थित केला आहे.