सत्ताधारी आणि विरोधक हे सगळे एकाच माळेचे मनी…; मनोज जरांगेंचा हल्लाबोल

सत्ताधारी आणि विरोधक हे सगळे एकाच माळेचे मनी…; मनोज जरांगेंचा हल्लाबोल

Manoj Jarange : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहेत. मराठा (Maratha) आणि ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने (State Govt) मंगळवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला विरोधकांनी बहिष्कार टाकला. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी (Manoj Jarange विरोधकांसह सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. सर्वच आमदार एकाच माळेचे मनी आहेत, अशी टीका त्यांनी केली.

राहुल गांधींना मोठा दिलासा; मुंबई उच्च न्यायालयाकडून ‘RSS’ प्रकरणी भिवंडी कोर्टाचा निर्णय रद्द 

मनोज जरांगेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीकडे विरोधकांनी पक्षाने पाठ फिरवली, शिवाय विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरक्षणाच्या मुद्यावरून राडे झाले, याविषयी विचारले असता जरांगे म्हणाले. आम्ही लहानपणापासून या आमदारांचा राडा पाहत आहोत. हे सगळे एकाच माळेचे मनी आहेत.

मराठ्यांची अडवणूक करू नका, आता सहन करणार नाही; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा 

पुढं बोलतांना जरांगे पाटील म्हणाले की, सरकारची आरक्षण राजकीय इच्छाशक्ती आहे, असं मी ऐकलं. पण विरोधक आले नाहीत, म्हणून तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही का?, तुम्हाला द्यायचंचं नाही, असा तर मला संशय यायला लागला आहे. सत्ताधारी असो की, विरोधक यांना कुणाचाच विचार करायचा नाही. ते एकाच माळेचे मनी आहे. विधीमंडळात हे जनतेचे, समाजाचे प्रश्न सोडवत नाहीत. हे फक्त राडेच करतात, अशी टीका जरांगेंनी केली.

शांतता रॅलीनंतरही सरकारने आरक्षणाची मागणी मान्य न केल्यास पुढील रणनीती ठरवणार. 288 आमदार पाडायचे की, निवडून द्यायचे याबाबत महाराष्ट्राची बैठक घेऊन निर्णय घेणार, असा इशाराही जरागेंनी दिला.

भुजबळांना फक्त दंगली घडवायच्या…
ओबीसींना आरक्षण असूनही एकत्र येताहेत तर आम्ही झोपणार का? सापडलेल्या कुणबी नोंदी रद्द करा असं ओबीसी नेते म्हणत असतील तर आम्ही गप्प राहणार नाही. मराठा समाज उघडा पडू देणार नाही, असं म्हणत त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली. भुजबळांना फक्त दंगली घडवायच्या आहेत. मात्र, मराठे ते होऊ देणार नाही, असं जरांगे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube