मुख्यमंत्री वारकरी महामंडळासाठी 50 कोटींची तरतूद; काय योजना राबविणार ?
मुंबईः मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची (Chief Minister Warkari Corporation) स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी नुकतीच केली होती. वारकरी महामंडळ स्थापना करण्याची अधिसूचनाही शासनाने आज जाहीर केली आहे. या मंडळाचे मुख्यालय हे पंढरपूर असणार आहे. हे मंडळ कसे कार्य करेल, मंडळाचे कामकाज कसे बघितले जाईल. कोणत्या योजना राबविल्या जातील, याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. (50 crore provision for Chief Minister Warkari Corporation; What plan will be implemented?)
Punit Balan : शिवमुद्रा ढोल ताशा पथक वाद्य पूजन सोहळा आणि सराव शुभारंभ
महामंडळाची रचना कशी?
मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असेल.
महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची “व्यवस्थापकीय संचालक” म्हणून नियुक्ती करण्यात येईल.
मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे भागभांडवल 50 कोटी इतके
महामंडळाचे कार्य कसे होणार-
सर्व तिर्थक्षेत्रांचा विकास, किर्तनकार व वारकऱ्यांना अन्न, निवारा, सुरक्षा, वैद्यकीय मदत, विमा कवच, पायाभूत सुविधा पुरविणार.
या महामंडळामार्फत वारकरी, किर्तनकार, तीर्थक्षेत्रांसाठी सोयी-सुविधा पुरविण्याबाबत कार्य करण्यात येईल.
महामंडळाच्या प्रस्तावित योजना-
महाराष्ट्र राज्यातील वारकरी संप्रदायाच्या अडीअडचणी, प्रश्न सोडवणे. सर्व पालखी सोहळ्यांच्या मार्गांची सुधारणा करणे, स्वच्छता, आरोग्य, निवारा व सुविधा यासाठी दरवर्षी आर्थिक तरतूद करुन नियोजन करण्यात येईल. आषाढी व कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षा, विमा संरक्षण कवच देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईलवारकरी भजनी मंडळाला भजन व किर्तन साहित्याकरिता (टाळ, मृदंग, विणा,) अनुदान देण्याची कार्यवाही करण्यात येईल, किर्तनकारांना आरोग्य विमा, मानधन सन्मान योजना राबविण्यात येईल आषाढी व कार्तिकी वारीसाठी दिंड्याना दरवर्षी सानुग्रह अनुदान देण्यात येईल.
‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ कशी राबविणार? जाणून घ्या ए टू झेड माहिती
पंढरपुर, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड, पिंपळनेर, त्र्यंबकेश्वर, पैठण, कोल्हापूर संस्थान, शेगाव, तारकेश्वर, भगवानगड, अगस्तऋषी, संत सावतामाळी समाज मंदीर, अरण ता. माढा जि. सोलापूर व इतरही तिर्थक्षेत्रांचा विकास करण्यात येईल.
चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी व इतर नद्या प्रदूषण मुक्त करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.
परंपरेने महिन्याची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृध्दापकाळामध्ये “वारकरी पेंशन” योजना सुरु करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.
संपूर्ण भारतभर वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारे ‘पूज्य सदगुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, आळंदी’ या संस्थेत विद्यार्थ्यांना फी नाही व शिक्षकांना वेतन नाही आणि कोणतेही शासकीय अनुदान नाही. या व अशा इतर संस्थांना किर्तनभवन, शिक्षण वर्ग, भजन हॉल या विकासकामांकरिता भरीव निधी देण्याबाबतची कार्यवाही महामंडळाकडून करण्यात येईल संत गोरोबा काका सेवा मंडळ तेर परिसर, ता.जि. उस्मानाबाद (धाराशिव) येथे 15 हजार स्केअर फुटाचा सभामंडपासाठी निधी मंजूर करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.
श्री संत मुक्ताबाई संस्थान, मुक्ताईनगर पालखी मार्ग व समाधी स्थळ याकरिता मंजूर झालेल्या निधीबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल. श्री क्षेत्र पंढरपूर येथे चंद्रभागा नदीच्या दोन्ही बाजूने घाट विकसित करण्याची कार्यवाही करण्यात येईल. श्री क्षेत्र पंढरपूर येथे म्हसोबा मंदिर ते विप्रदत्त घाटापर्यंत चंद्रभागेवरती पादचारी मार्ग अथवा झुलता पूल तयार करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
दिंड्यांसाठी मोठे वेगवेगळे कक्ष उभारणार
श्री क्षेत्र पंढरपूर येथील 65 एकरमध्ये काँक्रीटीकरण व दिंड्यांसाठी मोठे वेगवेगळे कक्ष उभारावे, त्यास नाममात्र शुल्क आकारण्यात यावेत. या जागेव्यतिरिक्त पालख्या, वाऱ्यांच्या पंढरपूरकडे येणाऱ्या सर्व मार्गांवर पंढरपूर शहराजवळ वारकऱ्यांच्या दिंड्यांसाठी, फडांसाठी तसेच त्यांच्या सोयीसुविधांसाठी भूसंपादन करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. सर्व पालखी सोहळ्यांचे मार्ग व्यवस्थित करुन प्रतिवर्षी त्याकरिता सर्व व्यवस्था करण्याकरिता कायमस्वरुपी निधी मंजूर करण्यात आहे. आषाढी व कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकरी, भाविक तसेच दिंडींच्या वाहनांना टोल माफ करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. महिला वारकऱ्यांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था, प्रसाधन गृहे, वस्त्रांतर व इतर अनुषंगिक सोयी सुविधा पुरविण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.