Download App

PM Modi यांच्या भेटीनंतर लक्षद्वीपच्या पर्यटनाला चालना; प्लॅटफॉर्म सर्चमध्ये 3,400 टक्क्यांनी वाढ

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी नुकतीच लक्षद्वीप बेटांना(Lakshadweep Island) भेट दिली. या भेटीदरम्यान मोदींनी तेथील समुद्रकिनाऱ्यांवर स्वत:चे काही फोटो काढून ते शेअर केले. त्यावेळी त्यांनी पर्यटकांना (tourists)लक्षद्विपला भेट देण्याचं आवाहन देखील केलं. त्यानंतर पर्यटकांकडून लक्षद्विपबाबतच्या प्लॅटफॉर्म सर्चमध्ये तब्बल 3 हजार 400 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशी माहिती ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी मेक माय ट्रीपनं (Make My Trip)दिली आहे.

Saapala Teaser: सस्पेन्स अन् थ्रिलरचा डबल डोस; चिन्मय मांडलेकरच्या ‘सापळा’चा टीझर रिलीज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर या बेटाबद्दल जगभरातील पर्यटकांना उत्सुकता लागली आहे. पीएम मोदींच्या भेटीनंतर लक्षद्वीपसाठी प्लॅटफॉर्मवरील सर्चमध्ये तब्लल 3 हजार 400 टक्क्यांनी वाढ झाल्याचे ऑनलाइन ट्रॅव्हल्स कंपनी मेक माय ट्रीपने सोशल मीडियावर सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर भारत आणि लक्षद्वीप अशा नव्या वादाला तोंड फुटलं आहे. पीएम मोदींच्या लक्षद्वीप भेटीनंतर काही फोटो शेअर केल्यानंतर मालदीव सरकारमधील महिला मंत्री मरियम शिउना यांनी पंतप्रधान मोदींच्या पोस्टवर आक्षेपार्ह टीका केली. त्यानंतर या नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

अजितदादा भाजप अन् शिंदेंना स्वस्थ बसू देणार नाही; जितेंद्र आव्हाडांचा दावा

त्यानंतर मालदीवमधील तीन मंत्र्यांना थेट निलंबित केलं आहे. त्यात आता भारतानं आक्रमक भूमिका घेतली आहे. याचे दुष्परिणाम देखील मालदिवला जाणवायला सुरुवात झाली आहे. मालदीवच्या मंत्र्यांकडून अशा प्रकारच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर आता अनेक भारतीयांनी आपले मालदीवचे फ्लाईट बुकिंग रद्द केले आहे. EaseMyTrip ने मालदीवच फ्लाइट बुकिंग रद्द केलं आहे.

मेक माय ट्रीपचे अधिकारी राज ऋषी सिंग यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर प्लॅटफॉर्मवर शोधांमध्ये 3400 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आम्हाला बीच ऑफ इंडिया मोहीम सुरु करण्याची प्रेरणा मिळाली आहे. त्यामुळे पर्यटकांना आता भारतातील समुद्रकिनाऱ्यांची माहिती मिळणार आहे. या मोहिमेंतर्गत पर्यटकांना आमच्याकडून काही सवलत देखील दिली जाणार असल्याचे मेक माय ट्रीपचे अधिकारी राज ऋषी सिंग यांनी सांगितले आहे.

follow us