Download App

किडनीवरच्या शस्त्रक्रियेनंतर भारतात परतणार Lalu Prasad Yadav, लेकीनं दिली माहिती

  • Written By: Last Updated:

सिंगापूर : राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या किडनीचे नुकतेच प्रत्यारोपण करण्यात आले. लालू प्रसाद यांची मुलगी रोहिणी आचार्य (Rohini Acharya) यांनी त्यांना किडनी दान केली. सिंगापूरमध्ये उपचार घेतल्यावर लालू प्रसाद यादव नुकतेच भारतात परतले आहेत. या स्थितीत लालूप्रसाद यादव यांना भेटण्याकरिता मोठ्या संख्येने लोक इच्छुक आहेत. त्यांच्या प्रकृतीची अपडेट जाणून घेण्याची सर्वानाच इच्छा आहे. मात्र डॉक्टरांनी लालूप्रसाद यादव यांना कमी लोकांना भेटण्याचा यावेळी सल्ला दिला.

रोहिणी आचार्य यांनी ट्विट केले की, तुम्हा सर्वांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. ही महत्त्वाची बाब म्हणजे आपले नेते लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीविषयी एक मोठी अपडेट आहे. बाबांचे (लालू प्रसाद यादव यांचे) नुकतेच प्रत्योरोपणाचे ऑपरेशन झाले. ही शस्त्रक्रिया अतिशय संवेदनशील असल्याने त्यांना आता पुढील काही दिवस कोणत्याही संसर्गापासून वाचवावे लागणार आहे. यामुळे त्यांना भेटण्यासाठी फार लोकांना परवानगी मिळणार नाही, जास्त लोकांना भेटण्यास त्यांना मनाई करण्यात आली, असे डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

पुढच्या ट्विटमध्ये लालू यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी लिहिले आहे की, डॉक्टरांनी सांगितले आहे की, एखाद्याला जर लालू प्रसाद यादव यांना भेटायचे असले तरी त्या प्रत्येकाला तोंडावर मास्क घालणे आवश्यक आहे. बाबांना जेव्हा कोणीही भेटेल तेव्हा त्यांनीही मास्क घातले पाहिजे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.

तसेच दुसऱ्या ट्विटमध्ये रोहिणी आचार्य यांनी लिहिले की, लालू प्रसाद यादव यांच्यावर तुमच्या सर्व जनतेचे प्रेम आहे. माझ्या वतीने मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की, भारतात पोहोचल्यावर तुम्ही वडिलांना भेटता तेव्हा त्यांना भेटताना नक्की ही काळजी घ्या. तुम्ही प्रत्येक जण भेटाल तेव्हा मास्क घाला आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आम्हाला मदत करा. असे प्रकारचे ट्विट करून याविषयी त्यांनी माहिती दिली.

Tags

follow us