Download App

Land For Job Scam : ‘ईडी’कडून पहिलं आरोपपत्र दाखल, राबडी देवींसह मीसा भारतींचं नाव

Land For Job Scam : रेल्वेमध्ये नोकऱ्यांच्या बदल्यात जमिनी जमिनीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग (money laundering)प्रकरणात ईडीनं (ED)पहिलं आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि आरजेडीचे अध्यक्ष लालुप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav)यांच्या पत्नी, बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी (Rabri Devi)आणि त्यांची कन्या खासदार मीसा भारती यांची नावं घेतली आहेत.

Pakistan : प्रशिक्षक पराभवाला जबाबदार; पाकिस्तानकडून तीन प्रशिक्षकांची सुट्टी!

एजन्सीच्या म्हणण्यानुसार, फिर्यादी तक्रारीत यादव कुटुंबाचे निकटवर्तीय अमित कात्याल, आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाचा कथित ‘जवळचा सहकारी’ आणि काही इतर व्यक्ती आणि कंपन्यांची नावं आहेत.

रेल्वेमध्ये नोकऱ्यांच्या बदल्यामध्ये जमीन घोटाळा प्रकरणी दिल्लीतील मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) विशेष न्यायालयासमोर आरोपपत्र दाखल केले आहे. न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 16 जानेवारीची तारीख निश्चित केली आहे.

Kiran Mane : पक्ष प्रवेशानंतर किरण मानेंनी थेटच सांगितलं; म्हणाले, ‘परिवर्तनाच्या लढाईत… ‘

ईडीनं गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कात्याल यांना या प्रकरणात अटक केली होती. तर लालू प्रसाद यादव आणि त्यांचा मुलगा व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना ईडीनं समन्स बजावले होते. मात्र अद्यापही ते हजर झाले नाहीत. हा कथित घोटाळा लालू प्रसाद यादव हे केंद्रामध्ये रेल्वेमंत्री होते.

2004 ते 2009 या दरम्यान भारतीय रेल्वेच्या विविध झोनमध्ये ग्रुप ‘डी’ पदांवर अनेकांची नियुक्ती करण्यात आली. त्या बदल्यात या लोकांनी आपली जमीन तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यांच्या कुटुंबीयांना आणि ए.के. इन्फोसिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे दिल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी पीएमएलएच्या फौजदारी कलमांतर्गत सीबीआयने नोंदवलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सीबीआयने यापूर्वीच आरोपपत्र दाखल केले आहे.

follow us

वेब स्टोरीज