Download App

लवकरात लवकर पाकिस्तान सोडा, केंद्र सरकारचे भारतीय नागरिकांना आदेश

 Pahalgam Attack : पाकिस्तानमधील भारतीय नागरिकांनी लवकरात लवकर पाकिस्तान सोडण्याचे आदेश भारत सरकारने नागरिकांना दिले आहे.

  • Written By: Last Updated:

 Pahalgam Attack : पाकिस्तानमधील भारतीय नागरिकांनी लवकरात लवकर पाकिस्तान (Pakistan) सोडण्याचे आदेश भारत सरकारने (Indian Government ) नागरिकांना दिले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Attack) येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. तर दुसरीकडे या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने देखील कारवाईला सुरुवात केली आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता सरकारने पाकिस्तानविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

बुधवारी रात्री पीएम मोदी (PM Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सरकारने परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर निर्णय जाहीर केले, ज्यात सिंधू पाणी करार निलंबित करणे, वाघा-अटारी सीमा बंद करणे, पाकिस्तानी नागरिकांसाठी सार्क अंतर्गत व्हिसा सूट रद्द करणे यांचा समावेश आहे. केंद्र सरकारने व्हिसा सूट रद्द केल्याने आता भारतात असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना 29 एप्रिलपूर्वी भारत सोडण्याचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहे.

तर दुसरीकडे सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांनाही लवकरात लवकर भारतात परतण्याचा सल्ला परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आला आहे. याच बरोबर भारतीय नागरिकांना पाकिस्तानचा प्रवास टाळण्याचा सल्ला देखील भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आला आहे.

भारताची कारवाई अन् पाकिस्तानी शेअर बाजारात हाहाकार; गुंतवणूकदारांना मोठा फटका

तर भारतीय सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा तात्काळ प्रभावाने स्थगित करण्याची घोषणा केली. पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले सर्व विद्यमान भारतीय व्हिसा 27 एप्रिल 2025  पासून रद्द करण्यात आले आहेत. पूर्वी जारी केलेले वैद्यकीय व्हिसा फक्त 29 एप्रिल 2025  पर्यंत वैध राहतील. नवीन नियमांनुसार, सध्या भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना त्यांचे व्हिसा संपण्यापूर्वी देश सोडण्यास सांगण्यात आले आहे.

follow us