Download App

LetsUpp Exclusive : आय लव्ह माय इंडिया, पर्यटकांसाठी जीव देऊ…, पहलगाम हल्ल्यानंतर टुरिट्स गाईडने मांडली आपली व्यथा

Pahalgam Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Attack) 27 पर्यटकांचा मृत्यू झाला होता

Pahalgam Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Attack) 27 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्या पाठीमागे पाकिस्तानचा (Pakistan) हात असल्याची माहिती भारत सरकारला मिळाली आहे. या माहितीनंतर भारताकडून पाकिस्तानावर कठोर कारवाई करण्यात येत आहे. भारताने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले आहे. याचबरोबर सिंधू जल करार देखील रद्द केला आहे. तर आता भारताकडून लष्करी कारवाई करण्याचा विचार देखील करण्यात येत असल्याने भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तर दुसरीकडे पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील अनेकजण बेरोजगार होत असल्याची माहिती समोर आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटक कमी झाल्याने याचा परिणाम अनेकांच्या रोजगारावर होताना दिसत आहे. त्यापैकी एक म्हणजे सैफ अडार. दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरची परिस्थिती काय? स्थानिक नागरिकांवर काय परिणाम होत आहे? याची माहिती घेण्यासाठी लेट्सअप काश्मीरमध्ये पोहचला आहे. यावेळी अडार यांनी हल्ल्यानंतर लोकांच्या जीवनात काय परिणाम होत आहे याबाबतची माहिती लेट्सअपला दिली.

अडार गेल्या 15 वर्षांपासून गुलमर्ग येथे टुरिट्स गाईडचा काम करत आहे. लेट्सअपशी बोलताना अडार म्हणाले की, पहलगाम येथे हल्ला कोणी केला याची माहिती आम्हाला नाही मात्र या हल्ल्यानंतर आमच्या जीवनात फरक पडत आहे. आमच्या रोजगारावर फरक पडत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर गुलमर्ग येथे देखील टुरिट्स खूप कमी येत आहे. दररोज आता 200-300 टुरिट्स येथ आहे. हल्ल्यापूर्वी यापेक्षा जास्त लोक येत होते मात्र आता खूप कमी लोक येत आहे अशी माहिती त्यांनी दिली.

तसेच काश्मीरमध्ये सर्वकाही व्यवस्थित आहे. पर्यटकांनी बुकिंग रद्द करु नये असा आवाहन देखील त्यांनी यावेळी देशातील नागरिकांना केले. दहशतवादी हल्ल्यापूर्वी दररोज आम्ही 700 -800 रुपये कमवत होते मात्र आता 400-500 रुपये कमवत आहे. असं देखील ते म्हणाले.

Israel Wildfires: मोठी बातमी! इस्त्रायलच्या जंगलात भीषण आग, आणीबाणी जाहीर

तसेच यानंतर असा हल्ला होऊ नये यासाठी सरकारने योग्य व्यवस्था केली पाहिजे. काश्मीरी लोक पर्यटकांसाठी जीव देखील देऊ शकतात. आय लव्ह माय इंडिया. आम्ही भारताशी प्रेम करत होतो आणि करणार, त्यामुळे पर्यटक इथे सुरक्षित आहे. त्यामुळे पर्यटकांनी कोणतीही बुकिंग रद्द करु नये, असा आवाहन देखील त्यांनी यावेळी केला.

follow us