Download App

Jammu Kashmir : जोरदार बर्फवृष्टीमुळं जनजीवन विस्कळीत; रस्त्यांसह विमान, रेल्वे बंद

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) बर्फवृष्टी (Snowfall) सुरु आहे. काही दिवसांपासून सातत्यानं होणाऱ्या हिमवृष्टीमुळं जनजीवन चांगलच विस्कळीत झालंय. बर्फवृष्टीमुळं रस्त्यांसह हवाई वाहतुकीवरही परिणाम झालाय. हवामान विभागाकडून (Department of Meteorology)हिमस्खलनाबद्दल (Avalanche)धोक्याचा इशारा देण्यात आलाय.

काश्मीर खोऱ्यात सोमवारी झालेल्या बर्फवृष्टीमुळं श्रीनगर विमानतळावरील (Srinagar Airport)सर्व उड्डाणं रद्द केली आहेत. राष्ट्रीय महामार्गही बंद केली आहेत. हवामान विभागानं नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलंय.

सातत्यानं होणाऱ्या बर्फवृष्टीमुळं येथील दृश्यमानता 500 मीटरपेक्षा कमी झालीय. यामुळं श्रीनगर विमानतळावरील सर्व 68 नियोजित उड्डाणं रद्द केलीत. खराब हवामानामुळं बारामुल्ला-बनिहाल रेल्वे मार्गावरील रेल्वे सेवाही बंद करण्यात आलीय.

श्रीनगर शहरात सोमवारी जोरदार हिमवृष्टी झाली आहे. गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग आणि इतर उंच भागात बर्फाची जाड चादर पसरलीय. जम्मू आणि काश्मीरमध्ये यंदाच्या हिवाळ्यातील पहिल्याच मोठ्या हिमवृष्टीनं सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झालंय.

घरांवर, रस्त्यावर चहुकडं बर्फच बर्फ दिसतंय. साचलेल्या बर्फामुळं अनेक रस्त्यांवरी वाहतूक बंद झालीय. यामुळं रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. प्रशासनाकडून रस्त्यावर साचलेला बर्फ हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरुय.

Tags

follow us