Download App

Arvind Kejriwal यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तिहारमध्ये होणार रवानगी?

  • Written By: Last Updated:

Arvind Kejriwal Custody : कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अडचणी वाढतांना दिसत आहे. केजरीवाल यांची ईडी कोठडी आज संपत आहे. दरम्यान, राऊस एव्हेन्यू कोर्टाने (Rouse Avenue Court) त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. केजरीवालांना आता १५ एप्रिलपर्यंत तुरुंगात राहावे लागणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केजरीवाल यांची तिहार तुरुंगात रवानगी होऊ शकते.

या विषयी अधिक माहिती अशी की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या कस्टडीत आहेत. अरविंद केजरीवाल यांची ईडी कोठडी संपल्यानंतर त्यांना आज पुन्हा राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी सकाळी 11.30 वाजता सुरू झाली. आजच्या सुनावणीत ईडीने न्यायालयाकडे केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य करून केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

या सुनावनीवेळी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू (S. V. Raju) हे ईडीच्या वतीने न्यायालयात हजर होते. केजरीवाल यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली होती. एस. व्ही राजू म्हणाले की, केजरीवाल यांनी ईडी अधिकाऱ्यांना फोनचा पासवर्ड सांगण्यास नकार दिला. इतर कोणत्याही डिजिटल उपकरणाचा पासवर्ड त्यांनी दिला नाही. ते कोणत्याही प्रश्नाचे नीट उत्तर देत नसल्याचं एस व्ही राजू यांनी कोर्टाला सांगितले आहे.

न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर केजरीवाल यांनी वकिलांकडून कोठडीत पुस्तके, औषधे, विशेष आहार आणि खुर्चीसाठी अर्ज केला आहे. तीन पुस्तके तुरुंगात नेण्याची मागणी केजरीवाल यांनी केली आहे. भगवद्गीता, रामायण आणि ‘हाऊ प्राइम मिनिस्टर्स डिसायड’ ही तीन पुस्तके वाचण्याची परवानगी मिळावी यासाठी केजरीवाल यांनी न्यायालयात अर्ज केला आहे. दरम्यान, यासंदर्भात न्यायालयाने अद्याप परवानगी दिलेली नाही.

follow us

वेब स्टोरीज